प्रियकराच्या घरच्यांचा विरोध; अनाथ मुलीचे पोलीस निरीक्षकाने लावून दिले लग्न

पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी ती मुलगी अनाथ असल्याचे निदर्शनास येताच संबंधित मुलाच्या कुटुंबियांचे समुपदेशन केले आणि पोलीस स्टेशनमध्येच दोघांचे लग्न लावून दिले.

प्रियकराच्या घरच्यांचा विरोध; अनाथ मुलीचे पोलीस निरीक्षकाने लावून दिले लग्न
प्रियकराच्या घरच्यांचा विरोध; अनाथ मुलीचे पोलीस निरीक्षकाने लावून दिले लग्न

सोलापूर : खाकी वर्दी म्हटले कि लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होतात. ज्यांना जसा अनुभव आलेला असतो, तशा प्रकारे प्रत्येक जण आपली वेगवेगळी मते मांडत असतो. खाकी संवेदनाशून्य असल्याचेही काहींचे मत असते. मात्र काही प्रसंगातून हे मत खोडले जाते. सोलापूर जिल्ह्यातील अनाथ मुलीच्या बाबतीत पोलीस निरीक्षकाने घेतलेल्या भूमिकेमुळे खाकी वर्दीतील माणुसकीचा प्रत्यय आला आहे. (The marriage of an orphan girl was arranged by a police inspector in solapur)

वेगवेगळ्या जातीतील तरुण-तरुणींमध्ये प्रेमसंबंध जुळले होते. मात्र मुलाच्या घरच्यांनी मुलगी परजातीतील आहे व ती अनाथ असल्याने तिच्याशी लग्न लावून देण्यास विरोध केला. अशा परिस्थितीत पोलीस निरीक्षकांनी खंबीर भूमिका घेत अनाथ मुलीचे त्याच मुलाशी लग्न लावून दिले. विशेष म्हणजे पोलीस निरीक्षकांनी स्वतः या लग्नाचा खर्च केला. त्यांच्या या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मुलाच्या कुटुंबियांचे समुपदेशन

प्रेमसंबंध असतानाही आपला प्रियकर आता लग्नास तयार नाही, हे सहन न झाल्यामुळे 22 वर्षीय तरूणीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली. पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी ती मुलगी अनाथ असल्याचे निदर्शनास येताच संबंधित मुलाच्या कुटुंबियांचे समुपदेशन केले आणि पोलीस स्टेशनमध्येच दोघांचे लग्न लावून दिले. स्वतः पोलीस निरीक्षक काळे यांनीच तक्रारदार अनाथ मुलीकरिता सोने, साडी तसेच मुलाला आहेर स्वखर्चाने खरेदी केला. तक्रारदार मुलीला जणू स्वतःची मुलगी मानून पोलीस स्टेशन आवारातच लग्न लावून दिले. प्रत्येक ठिकाणी कायद्याने शिक्षा न करता समुपदेशाने तुटण्याच्या मार्गावर असलेले कुटुंब पुन्हा एकत्र येऊन उभे राहू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणून या प्रकरणाकडे पाहता येणार आहे.

नेमके प्रकरण काय?

मिस्त्री म्हणून काम करणाऱ्या सचिन मंजुळकरची बिगारी काम करणाऱ्या यलव्वा टोणगे हिच्याशी ओळख झाली. कालांतराने दोघांच्या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. पण मुलाच्या घरचे मुलगी जातीतील नसल्यामुळे लग्नास तयार नव्हते. मुलीचे आईवडील सहा वर्षापूर्वीच वारले आहेत. सध्या ती आपल्या आजीसोबत राहत होती. त्यामुळे मुलगी बिगारी काम करून उदरनिर्वाह चालवत आहे. तिचे पालक कोणीच नाही तसेच घरच्यांचा तिच्याशी लग्न लावून देण्यास विरोध असल्यामुळे प्रियकर मुलगा लग्नास टाळाटाळ करु लागला. त्यामुळे मुलीने थेट पोलीस स्टेशन गाठले. तिने आपली व्यथा पोलीस निरीक्षकांपुढे मांडली. पोलीस निरीक्षक काळे यांनी मुलाला व त्याच्या कुटुंबियांना बोलावून घेतले. त्यांचे समुपदेशन करून स्वतः पोलीस निरीक्षक काळे यांनी तक्रारदार मुलीचे कन्यादान केले. (The marriage of an orphan girl was arranged by a police inspector in solapur)

इतर बातम्या

उस्मानाबादेत मांडूळाच्या तस्करीचा कट उधळला; 6 तस्करीच्या टोळीचा पर्दाफाश

लासलगावमध्ये अॅपे रिक्षा-हायवामध्ये अपघात, पाच जण जागीच ठार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI