ईडीचा पुन्हा दणका; अनिल देशमुखांशी संबंधित तीन ठिकाणांवर धाडी!

ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज पुन्हा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित तीन ठिकाणी धाडी टाकल्या. या धाडी नागपूर येथे टाकण्यात आल्या आहेत. (ED raids former Maharashtra home minister Anil Deshmukh's residence)

ईडीचा पुन्हा दणका; अनिल देशमुखांशी संबंधित तीन ठिकाणांवर धाडी!
अनिल देशमुख, नेते, राष्ट्रवादी
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 7:02 PM

मुंबई: ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज पुन्हा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित तीन ठिकाणी धाडी टाकल्या. या धाडी नागपूर येथे टाकण्यात आल्या आहेत. आतापर्यंत देशमुख यांच्याशी संबंधित ठिकाणांवर चार वेळा धाडी टाकण्यात आल्या आहेत.100 कोटी वसुलीच्या माध्यमातून झालेल्या मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. देशमुख यांची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही ईडीकडून ही कारवाई होत आहे. त्यामुळे देशमुख यांच्यासाठी हा मोठा दणका असल्याचं सांगितलं जात आहे. (ED raids former Maharashtra home minister Anil Deshmukh’s residence)

ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित ठिकाणी धाडी टाकल्या. सकाळी सुरू झालेल धाडसत्र संध्याकाळपर्यंत सुरू होत. पहिली धाड साई संस्थान ट्रस्टच्या एनआयटी कॉलेज कॅम्पसच्या कार्यलयात धाड टाकण्यात आली. त्यानंतर इतर दोन ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. साई संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष खुद्द अनिल देशमुख हे आहेत. तर त्यांच्या पत्नी आरती देशमुख आणि दोन्ही मुलं ही ट्रस्टी आहेत. त्यामुळे आजच्या कारवाईने देशमुख कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

देशमुखांशी संबंधित ठिकाणी टाकलेल्या धाडी

पहिली धाड: 25 मे 2021

25 मे 2021 रोजी ईडीने सर्वात पहिली धाड टाकली होती. नागपूर येथील शंकर नगर, छावणी भाग आणि जाफर नगर या ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यानंतर शिवाजी नगर भागातील हरेकृष्ण अपार्टमेंटमध्ये धाड टाकण्यात आली होती. ही कारवाई प्रामुख्याने सागर भटेवार यांच्याशी संबंधित ठिकाणी करण्यात आली होती. सागर भतेवार हे अनिल देशमुख यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.

दुसरी धाड: 25 जून 2021

या दिवशी ईडीने आठ ठिकाणी टाकल्या होत्या. या धाडी थेट अनिल देशमुख यांच्यावर होत्या. अनिल देशमुख यांचं वरळी सुखदा इमारतीतील घर, ज्ञानेश्वरी बंगला त्याच प्रमाणे त्यांच्या एका कार्यलयावर धाड टाकण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे सेक्रेटरी संजीव पालांडे, कुंदन शिंदे यांच्याशी संबंधित ठिकाणीही धाडी टाकण्यात आल्या होत्या. याच कारवाईत पालांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक करण्यात आली होती. या कारवाईवेळी देशमुख यांचा जबाब नोंदवण्यात आला होता.

तिसरी कारवाई: 2 जुलै 2021

2 जुलै रोजी ईडीने तिसऱ्यांदा अॅक्शन घेतली. अनिल देशमुख यांना समन्स देण्यासाठी ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी गेले होते. मात्र, त्या दिवशी देशमुख सापडले नाहीत.

चौथी कारवाई: 6 ऑगस्ट 2021

आज 6 ऑगस्ट रोजी ईडीने चौथ्यांदा कारवाई केली. ईडीने देशमुख यांच्या ट्रस्ट कार्यलयासह इतर दोन ठिकाणी आज कारवाई केली आहे.

देशमुखांना आतापर्यंत चार समन्स

पहिलं समन्स 25 जून रोजी दुसरं समन्स 26 जून रोजी तिसरं समन्स 5 जुलै रोजी चौथ समन्स 2 ऑगस्ट रोजी (ED raids former Maharashtra home minister Anil Deshmukh’s residence)

संबंधित बातम्या:

दोन्ही पीए अटकेत, अनिल देशमुखांवर अटकेची टांगती तलवार

ईडीची दिवसभर छापेमारी, नागपूर-मुंबईच्या निवासस्थानी धाडी, अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया काय?

Anil Deshmukh | अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, दोन्ही स्वीय सहाय्यकांना ईडीकडून अटक

(ED raids former Maharashtra home minister Anil Deshmukh’s residence)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.