AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CCTV | धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न अंगलट, पाय घसरुन पडलेल्या तरुणीला पोलिसांनी वाचवलं

तरूणी दुपारच्या सुमारास मालाड स्थानकात चर्चेगेटला जाण्यासाठी आली होती. त्यावेळी तिला चर्चेगेटच्या बाजूने जाणारी बोरिवली लोकल दिसली. ती बोरिवलीली जाणारी लोकल मालाडच्या फलाट क्रमांक 1 वरती होती. धावत असलेल्या लोकल तिने पकडण्याचा प्रयत्न केला.

CCTV | धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न अंगलट, पाय घसरुन पडलेल्या तरुणीला पोलिसांनी वाचवलं
मालाड स्थानकात लोकल पकडत असताना तरूणी Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 12:48 PM

मुंबई – धावती लोकल (local) पकडत असताना तरूणीचा पाय घसरला आणि तो कोसळत असल्याचा व्हिडीओ (video) सीसीटिव्हीत (cctv) कैद झाला आहे. ही घटना 2 मार्चला मालाड (malad) स्थानकात घडली असून त्या मुलीचं वय 17 आहे. तरूणीला वाचवण्यात रेल्वे पोलिसांना यश आल्याचे पाहायला मिळत आहे. तरूणी मालाडहून चर्चगेटला जाणारी लोकल धावत जाऊत पकडत होती, त्यावेळी तिथं तिचा पाय घसरला आणि कोसळली त्यावेळी तिथं कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांनी पाहिले आणि तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. तात्काळ रेल्वे रूळाच्या दिशेने जात असलेल्या मुलीला बाहेर खेचले त्यामुळे तीचा जीवदान मिळाले आहे. पोलिसांनी दाखवलेल्या धाडसामुळे मुलीला कसल्याही प्रकारची दुखापत झालेली नाही. तसेच मुलीने ज्या पोलिसांनी तिचे जीव वाचला त्याचे आभार मानले आहेत. मुंबईत अशा घटना नेहमी घडत असतात, अनेकदा लोकलला गर्दी असल्यानंतर असल्यानंतर अशा घटना घडत असतात. तर काहीवेळेला लोकलच्या दरवाजात उभे राहून स्टंट करणा-यांच्या बाबतीत अशा घटना घडत असतात.

नेमकं काय घडलं

तरूणी दुपारच्या सुमारास मालाड स्थानकात चर्चेगेटला जाण्यासाठी आली होती. त्यावेळी तिला चर्चेगेटच्या बाजूने जाणारी बोरिवली लोकल दिसली. ती बोरिवलीली जाणारी लोकल मालाडच्या फलाट क्रमांक 1 वरती होती. धावत असलेल्या लोकल तिने पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु तिचं अंदाज चुकला आणि पाय घसरला. त्यावेळी ती पाहणा-यांनी आरडाओरड केली. तसेच समोर बसलेल्या पोलिसांनी तिकडे धाव घेतली. ती रेल्वे रूळाकडे जाणार होती तेवढ्यात तरूणीला इंगवले, सातव, रणखंबे आणि पाटील यांनी बाहेर खेचले. त्यावेळी पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. त्याचबबरोबर तरूणीला कसलीही दुखापत झालेली नाही. त्यामुळे वाचवल्यानंतर इंगवले, सातव, रणखंबे आणि पाटील या पोलिसांचे आधार मानले असून कर्तव्य प्रमाणिकपणे करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

पोलिसांचं कौतुक

लोकलच्या परिसरात किंवा लोकलमध्ये एखादी घटना घडल्यानंतर त्याचा छडा लावण्याच मुंबई पोलिस कायम तत्पर असल्याचे आपणास अनेक घटनांमधून पाहायला मिळाले आहे. मागच्या आठ दिवसांपूर्वी नालासोपारा रेल्वेस्थानकाच्या परिसरात एका महिलेची तरूणाने छे़ड काढली होती. त्यावेळी तो घटनास्थळावरून पळून गेला असल्याचे व्हिडीओत दिसत होते. त्यानंतर पोलिसांनी व्हिडीओची पडताळणी केल्यानंतर त्या तरूणाला 24 तासाच्या आत ताब्यात घेतले असल्याचे पाहायला मिळाले. मालाडमध्ये तरूणीला वाचवल्यानंतर अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे.

रशियाकडून युक्रेनमध्ये तूर्तास युद्धविराम, परदेशी नागरिकांना मायदेशी जाण्यासाठी मोठा निर्णय

बायकोला परीक्षेला सोडलं अन् काळानं गाठलं, औरंगाबादेत दोन दुचाकींचा भीषण अपघात, दोघे जागीच ठार!

IND vs SL: विराट, ऋषभला जमलं नाही, ते ‘बापू’ने मैदानावर करुन दाखवलं

बुध-सूर्य संक्रमण होणार; येणारे १६ दिवस संकटांनी भरलेले असतील!
बुध-सूर्य संक्रमण होणार; येणारे १६ दिवस संकटांनी भरलेले असतील!.
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....