AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai crime : ‘मुस्लिमांना हिंदू आधार कार्ड, अवघ्या 2 हजारात!’ सापळा रचून बनावट कागदपत्र बनवणाऱ्यास अटक, कांदिवली पोलिसांची कारवाई

विशेष म्हणजे पोलिसांनी एका इसमाला बनावट मुस्लिम ग्राहक बनवून आरोपीकडे आधार कार्ड बनवण्यासाठी पाठवलं होतं. त्यानंतर या सगळ्या प्रकाराचा भांडाफोड झालाय.

Mumbai crime : 'मुस्लिमांना हिंदू आधार कार्ड, अवघ्या 2 हजारात!' सापळा रचून बनावट कागदपत्र बनवणाऱ्यास अटक, कांदिवली पोलिसांची कारवाई
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 25, 2022 | 1:02 PM

मुंबई : मुंबईत मुस्लिम बांधवांना (Muslim Community) बनावट कागदपत्रांद्वारे हिंदू आधार कार्ड (Hindu Adhar Card) तयार करुन दिलं होतं. हे करुन देण्याऱ्याला पोलिसांनी (Kandivali Police) अखेर अटक केली आहे. कांदिवली पोलिसांनी रंगेहाथ एकाला याप्रकरणी बेड्या ठोकल्या आहेत. अवघ्या दोन हजार रुपयांमध्ये बनावट कागदपत्र देऊन मुस्लिमांचं हिंदू धर्मांतर करुन दिलं जात होतं. त्यानंतर मुस्लिमांना हिंदू नावाने आधार कार्ड बनवून दिलं जातंय. याप्रकरणाची माहिती पोलिसांनी मिळाल्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. महेंद्र किशोर मानमोडे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. या आरोपीचं वय 31 वर्ष आहे. आरोपी कांदिवली पूर्वेतील आकुर्ली रोड येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या अटक करण्यात आलेल्या आरोपीची कसून चौकशी पोलिसांकडून केली जातेय. एकूण किती जणांना त्याने असं धर्मांतर करत हिंदू आधार कार्ड बनवून दिलं होतं, याचा तपास पोलिसांकडून केला जातोय.

सापळा रचून अटक

कांदिवली पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सदाशीव सावंत यांनी सांगितलं की, अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून अनेक नगरसेवक आणि शाळेच्या मुख्याध्यापकांच्या शिक्क्यासह इतर अनेक कागदपत्रदेखील जप्त करण्यात आलेली आहेत. फक्त दोन हजार रुपये देऊन आरोपी हे काम करत असल्याचंही आमच्या निदर्शनास आलं. विशेष म्हणजे पोलिसांनी एका इसमाला बनावट मुस्लिम ग्राहक बनवून आरोपीकडे आधार कार्ड बनवण्यासाठी पाठवलं होतं. त्यानंतर या सगळ्या प्रकाराचा भांडाफोड झालाय.

तयार करुनही दाखवलं

आरोपींनी पोलिसांनी पाठवलेल्या बनावट ग्राहकाकडून दोन हजार रुपये घेऊन त्याचे बनावट कागदपत्र तयार करून कांदिवली पश्चिम येथील बँक ऑफ बडोदा येथे असलेल्या आधार कार्ड केंद्रावर जाऊन मुस्लिम ग्राहकाचे आधार कार्ड हिंदू नावाने बनवले, अशी माहिती पोलीस निरीक्षक सदाशीव सावंत यांनी दिलीय.

हे सुद्धा वाचा

सध्या कांदिवली पोलीस आरोपीला अटक केली असून त्याने आतापर्यंत किती मुस्लिमांचे हिंदू धर्मांतर केले आहे याचा तपास सुरू आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत किती नगरसेवक, मुख्याध्यापकांनी बनावट लेटर पॅड आणि शिक्के तयार करून बनावट कागदपत्रे तयार केली आहेत, याचाही तपास पोलीस करत आहेत.

अजित पवारांनी घेतली कुंडमळा पूल दुर्घटनेतील जखमींची भेट
अजित पवारांनी घेतली कुंडमळा पूल दुर्घटनेतील जखमींची भेट.
सांगलीत कॉंग्रेसला मोठा धक्का! जयश्री पाटील भाजपात प्रवेश करणार
सांगलीत कॉंग्रेसला मोठा धक्का! जयश्री पाटील भाजपात प्रवेश करणार.
व्हायरल झालेल्या आजी-आजोबाशी खास बातचीत
व्हायरल झालेल्या आजी-आजोबाशी खास बातचीत.
नाराजीनाट्यानंतर सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश
नाराजीनाट्यानंतर सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास पवारांचा विरोध; स्पष्टच सांगितल कारण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास पवारांचा विरोध; स्पष्टच सांगितल कारण.
गळा चिरून शेतात फेकलं, 14 वर्षीय मुलाच्या हत्येने जळगाव हादरलं
गळा चिरून शेतात फेकलं, 14 वर्षीय मुलाच्या हत्येने जळगाव हादरलं.
किंचाळ्या, खिडक्यांना लटकलेले विद्यार्थी अन्..
किंचाळ्या, खिडक्यांना लटकलेले विद्यार्थी अन्...
बीडमध्ये झळकले वाल्मिक कराडचे फोटो असलेले बॅनर
बीडमध्ये झळकले वाल्मिक कराडचे फोटो असलेले बॅनर.
लंडनला जाणारी एअर इंडियाची AI-159 फ्लाईट रद्द, प्रवाशांनी व्यक्त केला
लंडनला जाणारी एअर इंडियाची AI-159 फ्लाईट रद्द, प्रवाशांनी व्यक्त केला.
कोचीवरून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं नागपुरात इमर्जन्सी लँडिंग
कोचीवरून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं नागपुरात इमर्जन्सी लँडिंग.