देश हादरवण्याचा कट, सातवी कारवाई, जोगेश्वरीतून आणखी एकाला उचलला, ATS-CBI अॅक्शन मोडमध्ये!

महराष्ट्रा एटीएस आणि गुन्हे शाखेने केलेल्या एकत्रित कारवाईत शुक्रवारी रात्री जोगेश्वरी येथून एकाला ताब्यात घेण्यात आलं. जाकीर नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

देश हादरवण्याचा कट, सातवी कारवाई, जोगेश्वरीतून आणखी एकाला उचलला, ATS-CBI अॅक्शन मोडमध्ये!
CBI detained person from jogeshwari in connection with the terror module busted by Delhi Police
Follow us
| Updated on: Sep 18, 2021 | 8:40 AM

मुंबई : महराष्ट्रा एटीएस आणि गुन्हे शाखेने केलेल्या एकत्रित कारवाईत शुक्रवारी रात्री जोगेश्वरी येथून एकाला ताब्यात घेण्यात आलं. जाकीर नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे कनेक्शन दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या अतिरेक्यांसोबत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इतकंच नाही तर संशयित व्यक्ती अंडरवर्ल्डशी संबंधित असून, तो जान मोहम्मद  (Jan Mohammad Shaikh) याचा हँडलर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एटीएस आणि क्राईम ब्रांचकडून सध्या याप्रकरणाचा तपास सुरू आहे.

जाकीर हा जान मोहमद याच्या संपर्कात होता. जाकीरने जान मोहमदला मुंबईत हत्यार आणण्यासाठी सांगितलं, असा पोलिसांना संशय आहे.

मोठा कट उधळला

देशात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा मोठा कट दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उधळून लावला आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याची योजना असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी 14 सप्टेंबरला सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली असून त्यापैकी एक मुंबईच्या धारावी परिसरातील रहिवासी आहे. समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख (Jan Mohammad Shaikh) याला राजस्थानच्या कोटामधून ताब्यात घेण्यात आलं असून तो सायन पश्चिमेकडील एमजी रोडवर असणाऱ्या कालाबखर परिसरात वास्तव्यास होता. जान मोहम्मद शेखच्या कुटुंबीयांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं असता त्याच्या पत्नीने पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली.

दिल्लीला निघताना शेख ताब्यात

जान मोहम्मद शेख कोटा येथून दिल्लीच्या दिशेने जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. जान मोहम्मद शेख हा कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम याच्याही संपर्कात होता, अशी माहिती मिळत आहे. सहा संशयितांना पाकिस्तानातून प्रशिक्षण मिळत असल्याची माहिती आहे. देशभर सण-उत्सवांची धामधूम सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गर्दी वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर बॉम्बस्फोट घडवून खळबळ उडवून देण्याची दहशतवादी योजना असल्याचं समोर आलं आहे.

गिरगाव चौपटीची रेकी?  

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी मॉड्यूलचा (Pakistan-organized module) भांडाफोड केल्यानंतर अटक करण्यात आलेल्या 47 वर्षीय समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख (Jan Mohammad Shaikh) याने गणपती विसर्जनासाठी महत्त्वाचे ठिकाण असलेल्या दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटी, मरिन ड्राईव्ह परिसराची त्याने रेकी केली होती. तसेच अनेक वेळा त्याने मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्थानकांची तपासणीही केली होती, अशी माहिती दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) सूत्रांनी दिली.

जान मोहम्मद शेख कोण आहे?

महाराष्ट्र एटीएसतर्फे देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे जान मोहम्मद शेख एटीएसच्या रडारवर होता. त्याला मुंबईत अनेक वर्ष टॅक्सी चालवण्याचा अनुभव आहे. त्यामुळे त्याला मुंबईच्या रस्त्यांची खडा न् खडा माहिती आहे. त्याच्यावर मुंबईत घातपात घडवून आणण्याची जबाबदारी सोपवण्यात येणार होती, अशी माहिती मिळत आहे. जान मोहम्मद हा 13 सप्टेंबर रोजी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरुन दिल्लीला रवाना झाला होता. जान मोहम्मदचा अनेक वर्षांपूर्वीपासूनच दाऊद गँगसोबत संबंध होता. जवळपास 20 वर्षांपूर्वी जान मोहम्मदवर मुंबईच्या पायधुनी पोलीस ठाण्यात गोळीबार, तोडफोड, चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी माहिती समोर आली आहे.

कर्जबाजारी झाला होता!

मिळालेल्या माहिती प्रमाणे जान मोहम्मद याने टॅक्सी आणि दुचाकी वाहनासाठी कर्ज घेतले होते. मात्र कर्ज भरण्यात अपयशी ठरला म्हणून त्याची दोन्ही वाहनं जप्त करण्यात आली होती. पैशांसाठी तो घातपाताच्या या कटात सहभागी झाला असावा, असा संशय तपास यंत्रणेला आहे. त्याला राजस्थानच्या कोटा शहरातून अटक करण्यात आली. या प्रकरणात उच्च स्तरीय सखोल चौकशी सुरु आहे.

अंडरवर्ल्डसोबत जवळीक

जान मोहम्मदला गुन्हेगारी पार्श्वभूमी असून तो पूर्वीपासून डी गँगच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. तो टॅक्सी ड्रायव्हर होता. मुंबईच्या रस्त्यांची आणि महत्त्वाच्या ठिकाणांची त्याला माहिती होती. तो घातपात करण्याच्या कटात उपयोगी ठरु शकेल, या हेतूने त्याला डी गँगतर्फे जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला गेला असावा. त्यातच कर्जबाजारी झाल्याने पैशाच्या आमिषापोटी तो डी गँगच्या जाळ्यात अडकला असावा, असा संशय तपास यंत्रणेला आहे.

संबंधित बातम्या : 

महाराष्ट्र ATS ची टीम दिल्लीत, संशयित दहशतवादी जान मोहम्मद शेखची चौकशी करणार

टॅक्सी चालक जान मोहम्मद दाऊद गँगच्या संपर्कात कसा? तपास यंत्रणांसमोर मोठे आव्हान

मित्रांसोबत यूपीला जातो म्हणताच पत्नीला आलेला संशय, संशयित दहशतवादी जान मोहम्मदने कुटुंबीयांना काय काय सांगितलं?

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.