टॅक्सी चालक जान मोहम्मद दाऊद गँगच्या संपर्कात कसा? तपास यंत्रणांसमोर मोठे आव्हान

जान मोहम्मद शेख हा टॅक्सी चालक असून सायन पश्चिमेकडील एमजी रोडवर असणाऱ्या कालाबखर झोपडपट्टी भागात राहत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला पत्नी आणि दोन मुलीही आहेत. त्यापैकी एका मुलीने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे, तर दुसरी मुलगी शाळेत शिकते.

टॅक्सी चालक जान मोहम्मद दाऊद गँगच्या संपर्कात कसा? तपास यंत्रणांसमोर मोठे आव्हान
Jan Mohammed Ali Shaikh

मुंबई : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेली मुंबईतील धारावी नेहमीच चर्चेत असते. कोरोनाच्या विरोधात धारावी पॅटर्ननंतर पुन्हा एकदा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे या भागात राहणारा टॅक्सी ड्रायव्हर जान मोहम्मद शेख (Jan Mohammad Shaikh) हा संशयित दहशतवादी अटकेत आहे. दिल्ली पोलिसांनी अटक केलेला एक सामान्य टॅक्सी चालक अंडरवर्ल्ड डॉन दाऊद गँगच्या संपर्कात कसा आला, हा एक मोठा प्रश्न आहे.

जान मोहम्मद शेख हा टॅक्सी चालक असून सायन पश्चिमेकडील एमजी रोडवर असणाऱ्या कालाबखर झोपडपट्टी भागात राहत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला पत्नी आणि दोन मुलीही आहेत. त्यापैकी एका मुलीने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे, तर दुसरी मुलगी शाळेत शिकते.

जान मोहम्मद शेख कोण आहे?

महाराष्ट्र एटीएसतर्फे देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे जान मोहम्मद शेख एटीएसच्या रडारवर होता. त्याला मुंबईत अनेक वर्ष टॅक्सी चालवण्याचा अनुभव आहे. त्यामुळे त्याला मुंबईच्या रस्त्यांची खडा न् खडा माहिती आहे. त्याच्यावर मुंबईत घातपात घडवून आणण्याची जबाबदारी सोपवण्यात येणार होती, अशी माहिती मिळत आहे. जान मोहम्मद हा 13 सप्टेंबर रोजी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरुन दिल्लीला रवाना झाला होता. जान मोहम्मदचा अनेक वर्षांपूर्वीपासूनच दाऊद गँगसोबत संबंध होता. जवळपास 20 वर्षांपूर्वी जान मोहम्मदवर मुंबईच्या पायधुनी पोलीस ठाण्यात गोळीबार, तोडफोड, चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी माहिती समोर आली आहे.

कर्जबाजारी झाला होता!

मिळालेल्या माहिती प्रमाणे जान मोहम्मद याने टॅक्सी आणि दुचाकी वाहनासाठी कर्ज घेतले होते. मात्र कर्ज भरण्यात अपयशी ठरला म्हणून त्याची दोन्ही वाहनं जप्त करण्यात आली होती. पैशांसाठी तो घातपाताच्या या कटात सहभागी झाला असावा, असा संशय तपास यंत्रणेला आहे. त्याला राजस्थानच्या कोटा शहरातून अटक करण्यात आली. या प्रकरणात उच्च स्तरीय सखोल चौकशी सुरु आहे.

अंडरवर्ल्डसोबत जवळीक

जान मोहम्मदला गुन्हेगारी पार्श्वभूमी असून तो पूर्वीपासून डी गँगच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. तो टॅक्सी ड्रायव्हर होता. मुंबईच्या रस्त्यांची आणि महत्त्वाच्या ठिकाणांची त्याला माहिती होती. तो घातपात करण्याच्या कटात उपयोगी ठरु शकेल, या हेतूने त्याला डी गँगतर्फे जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला गेला असावा. त्यातच कर्जबाजारी झाल्याने पैशाच्या आमिषापोटी तो डी गँगच्या जाळ्यात अडकला असावा, असा संशय तपास यंत्रणेला आहे.

इतरांचाही तपास सुरु

जान मोहम्मदच्या पत्नी, मुलगी आणि इतर जवळच्या लोकांची पोलिस, एटीएसकडून चौकशी केली जात आहे. धारावीतला मोहम्मद असगर शेख, ज्याने जान मोहम्मदला एकदा अजमेर, आणि दुसऱ्या वेळी निजामुद्दीन येथे जाण्यासाठी तिकीट काढून दिले होते, त्याची मंगळवारी रात्रीपासून चार वेळा चौकशी करण्यात आली आहे. जान मोहम्मद आणि इतर आरोपींचे जाळे कुठपर्यंत पसरले आहे, अटक झालेल्या आरोपींच्या व्यतिरिक्तही इतर काही जण यात सहभागी आहेत का, याचा शोध तपास यंत्रणेकडून युद्ध स्तरावर सुरु आहे.

संबंधित बातम्या :

मित्रांसोबत यूपीला जातो म्हणताच पत्नीला आलेला संशय, संशयित दहशतवादी जान मोहम्मदने कुटुंबीयांना काय काय सांगितलं?

Ak 47 कशी चालवायची, पाठलागापासून कसे वाचायचे? संशयित दहशतवाद्यांना पाकिस्तानात कोणकोणते प्रशिक्षण?

जान मोहम्मदला लहानपणापासून ओळखतो, परवाच एकत्र चहा झाला, संशयित दहशतवाद्याच्या अटकेनंतर मित्रांना धक्का

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI