Bhiwandi Crime | 14 वर्षीय मोलकरणीवर जंगलात अत्याचार, भिवंडीत मालकाला अटक

सहा वर्षांपूर्वी पीडित मुलीच्या वडिलांचे निधन झाले. तर तिची आई अन्य पुरुषासोबत निघून गेली. त्यामुळे आधार हरपलेल्या मुलीला भिवंडीतील गणेशपुरी पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या एका गावातील आरोपीने घरी आणले.

Bhiwandi Crime | 14 वर्षीय मोलकरणीवर जंगलात अत्याचार, भिवंडीत मालकाला अटक
प्रातिनिधीक फोटो
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Dec 16, 2021 | 10:22 AM

भिवंडी : 14 वर्षीय मोलकरणीवर मालकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीला स्थानिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भिवंडीतील गणेशपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. अल्पवयीन मुलीवर मालकाने राहत्या घरासह जंगलात नेऊन अत्याचार केल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

लडकू मुकणे असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे. सहा वर्षांपूर्वी पीडित मुलीच्या वडिलांचे निधन झाले. तर तिची आई अन्य पुरुषासोबत निघून गेली. त्यामुळे आधार हरपलेल्या मुलीला भिवंडीतील गणेशपुरी पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या एका गावातील आरोपीने घरी आणले.

जंगलात धमकावून अत्याचार

नातवंड सांभाळणे आणि घरातील बकऱ्या चारणे या कामासाठी त्याने तिला घरी ठेवले. मे महिन्यात पीडिता जंगलात बकऱ्या चारण्यासाठी गेली असताना मालकाने तिच्यावर अत्याचार केला. तसंच याची वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. धमक्यांमुळे पीडिता घाबरल्याचं पाहून ती वारंवार तिच्यावर अत्याचार करत राहिल्याचा आरोप आहे.

आरोपी 13 डिसेंबर 2021 रोजी राहत्या घरी तिच्यावर अत्याचार करत असताना त्याच्या पत्नीने पाहिले. याबाबत तिने आपल्या शेजारी राहणाऱ्या महिलेला सांगितले. त्यानंतर श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला पोलिसांच्या हवाली केले. आरोपी मालकाविरोधात पोक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली.

संबंधित बातम्या :

Chain Snatching | पादचारी महिलांच्या सोनसाखळ्यांची चोरी, मुंबईत 32 वर्षीय जिम ट्रेनरला अटक

Video| भिवंडीत घराच्या समोर पार्क केलेली रिक्षा चोरीला, घटना सीसीटीव्हीत कैद

खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्सच्या दुकानात घुसायचे, अंगठ्या चोरुन पसार व्हायचे; मैत्रिणींना गिफ्ट देण्यासाठी तरुणांचा फंडा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें