Video| भिवंडीत घराच्या समोर पार्क केलेली रिक्षा चोरीला, घटना सीसीटीव्हीत कैद

भिवंडीच्या ग्रामीण भागातून वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. अशीच एक घटना तालुक्यातील वज्रेश्वरीमधून समोर आली आहे. घरासमोर लावलेली रिक्षा मध्यरात्री दीडच्या सुमारास चोरट्यांनी चोरून नेली.

Video| भिवंडीत घराच्या समोर पार्क केलेली रिक्षा चोरीला, घटना सीसीटीव्हीत कैद
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Dec 16, 2021 | 8:14 AM

ठाणे : भिवंडीच्या ग्रामीण भागातून वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. अशीच एक घटना तालुक्यातील वज्रेश्वरीमधून समोर आली आहे. घरासमोर लावलेली रिक्षा मध्यरात्री दीडच्या सुमारास चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. हा सर्वप्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, याप्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटना सीसीटीव्ही कैद

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील वज्रेश्वरीमधून राजू पाटील यांच्या मालिकीची रिक्षा चोरीला गेली आहे. त्यांनी रात्री आपली रिक्षा क्रमांक MH 04 KA 0559 ही घरासमोर पार्क केली होती. परंतु रात्री दीडच्या सुमारास अज्ञात दोन चोरट्यांनी घरासमोरून रिक्षा ढकलत नेली. राजू पाटील यांच्या घराच्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध 

दरम्यान आपली रिक्षा चोरीला गेल्याचे लक्षात येताच राजू पाटील यांनी गणेशपुरी पोलीस ठाण्यात अज्ञान दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदरील घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या सीटीटीव्हीच्या फुटेजवरून संबंधित चोरांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. भिवंडीच्या ग्रामीण भागात वाहन चोऱ्या वाढल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली असून, वाहन चोरांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.

संबंधित बातम्या

Ulhasnagar Crime : उल्हासनगरात जेष्ठ नागरिकांना साडेपाच कोटींचा गंडा, जास्त परताव्याचं आमिष देत केली फसवणूक

Pune Crime: खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्सच्या दुकानात घुसायचे, अंगठ्या चोरुन पसार व्हायचे; मैत्रिणींना गिफ्ट देण्यासाठी तरुणांचा फंडा

Pune crime |पिकअप गाडीचा दरवाजा उचकटून लांबवले अडीच लाख ; अज्ञातावर गुन्हा दाखल

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें