पूजेच्या नावाखाली बोलावून बलात्कार, महिला भक्ताच्या आरोपानंतर मुंबईत भोंदूबाबाला बेड्या

गेल्या दहा वर्षांपासून त्याची भक्त असलेल्या महिलेनेच बलात्काराचा आरोप केला आहे. भोंदूबाबा मुंबईतील हायप्रोफाईल भागांमध्ये कार्यालय उघडायचा, त्यानंतर पूजेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करायचा, असं पोलिसांनी सांगितलं.

पूजेच्या नावाखाली बोलावून बलात्कार, महिला भक्ताच्या आरोपानंतर मुंबईत भोंदूबाबाला बेड्या
महिलेवर बलात्कार, भोंदूबाबाला अटक

मुंबई : पूजेच्या नावाखाली बोलावून बलात्कार करणाऱ्या भोंदूबाबाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गोड बोलण्यात फसवून भोंदूबाबाने आपल्यावर लैंगिक अत्याचार केला, असा आरोप गेल्या दहा वर्षांपासून त्याची भक्त असलेल्या महिलेनेच केला आहे. मुंबईतील कांदिवली पोलिसांनी या भोंदूबाबाला अटक केली आहे. यामुळे आरोपी बाबाच्या भक्तांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

महिला भक्ताची कांदिवली पोलिसात तक्रार

पूजापाठ आणि देवाच्या नावाखाली भक्तांना जाळ्यात अडकवून भोंदूबाबाने त्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला जात आहे. या भोंदूबाबाकडे सेवा करणाऱ्या एका महिला भक्ताने कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे.

महिलेचा दावा काय

भोंदूबाबाने आधी आपल्याला बड्या-बड्या थापा मारुन फसवलं, आपला भक्त केलं, त्यानंतर दरम्यानच्या काळात बलात्कार केला, असा आरोप पीडितेने केला आहे. ती 2011 पासून भोंदूबाबाची भक्त असल्याची माहिती आहे.

हायप्रोफाईल भागांमध्ये कार्यालय

भोंदूबाबा मुंबईतील हायप्रोफाईल भागांमध्ये कार्यालय उघडायचा, त्यानंतर पूजेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करायचा, असं पोलिसांनी सांगितलं. कांदिवली आणि बोरीवली भागात असलेल्या त्याच्या ऑफिसमध्ये भक्तांची नियमित गर्दी असल्याचंही सांगितलं जातं.

मुंबईतील गायिकेचाही अशाचप्रकारे भोंदूबाबावर होता आरोप

दरम्यान, समृद्धी आणि व्यवसायवृद्धीसाठी घरात पूजा करण्याच्या बहाण्याने 21 वर्षीय गायिकेवर बलात्कार केल्याचा प्रकार गेल्या वर्षी मुंबईत उघडकीस आला होता. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी भोंदूबाबाला अटक केली होती. ‘तुझ्या शरीरात एक अपवित्र आत्मा आहे, एखादा शुद्ध पुजारीच हा आत्मा बाहेर काढू शकेल’, असं सांगून आरोपीने तरुण गायिकेवर बलात्कार केल्याचा आरोप झाला होता.

तेव्हा काय घडलं होतं

पीडिता आणि तिचा पती गृहप्रवेशाच्या पूजेसाठी ज्योतिषाच्या शोधात होते. व्यावसायिक पातळी फारशी भरभराट नसल्याने दोघांनी एका मित्राची मदत मागितली होती. तेव्हा, समृद्धी आणि व्यवसायवृद्धीसाठी घरात होमहवन करण्याचा सल्ला त्यांना मिळाला. त्यावेळी त्याच परिसरात राहणाऱ्या आरोपीशी दोघांची ओळख झाली.

पीडिता आणि तिच्या पतीने त्याला पूजेसाठी घरात बोलावलं. पूजेचं साहित्य आणण्यासाठी पती बाहेर गेला. तेव्हा, ‘तुझ्या शरीरात एक अपवित्र आत्मा आहे, त्यामुळे तुला व्यावसायिकदृष्ट्या अपयश येत आहे. शरीरातील अपवित्र आत्मा बाहेर काढण्यासाठी तुला नग्न व्हावं लागेल’ असं आरोपीने पीडितेला सांगितलं होतं.

संबंधित बातम्या :

मुंबईत 21 वर्षीय गायिकेवर बलात्कार, भोंदूबाबाला अटक

गुप्तधन आणि पुत्रप्राप्तीचे आमिष, भोंदूबाबाकडून एका मुलीवर बलात्कार, कुटुंबातील तिघींचा विनयभंग

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI