मुंबईतील शिक्षकाला सहकुटुंब जीवे मारण्याची धमकी, पत्रासोबतच बंदुकीच्या दोन गोळ्या

संतोष साबळेंना पाठवलेल्या पत्रात लिहिलं होतं "मौत का पैगाम, तुम्हारे और फॅमिली के नाम". इतकंच नाही तर त्या पत्रासोबत बंदुकीच्या दोन गोळ्या सुद्धा ठेवण्यात आल्या होत्या.

मुंबईतील शिक्षकाला सहकुटुंब जीवे मारण्याची धमकी, पत्रासोबतच बंदुकीच्या दोन गोळ्या
मुंबईतील शिक्षकाला धमकी पत्र

मुंबई : जिल्हा परिषदेमध्ये शिकवणार्‍या मुंबईतील शिक्षकाला त्याच्या कुटुंबीयांसह जीवे मारण्याची धमकी मिळाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही धमकी एका पत्राद्वारे मिळाली असून त्यासोबतच बंदुकीच्या दोन गोळ्या सुद्धा पाठवण्यात आल्या आहेत.

संतोष पांडुरंग साबळे हे 14 ऑगस्ट रोजी दहिसरमधील केतकीपाडा येथे राहणाऱ्या त्यांच्या आई-वडिलांना भेटायला गेले होते. 38 वर्षीय संतोष साबळे हे गेल्या दहा वर्षापासून वसई परिसरात राहतात आणि ते नियमितपणे आपल्या पालकांना भेटायला दहिसरला येत असतात.

लाकडी बॉक्समधून धमकीचे पत्र

घराच्या दरवाजाबाहेर ठेवलेल्या एका लाकडी बॉक्सवर संतोष साबळे यांची नजर पडली आणि त्यांनी तो उचलला. त्या बॉक्समध्ये असलेल्या पत्रावर संतोष साबळे यांचं नाव लिहिलं होतं. संतोष साबळे यांनी जेव्हा ते पत्र उघडलं, तेव्हा त्याच्यात हिंदीमध्ये त्यांच्यासाठी एक निरोप लिहिला होता.

“मौत का पैगाम, तुम्हारे और फॅमिली के नाम”

पत्रात लिहिलं होतं की “मौत का पैगाम, तुम्हारे और फॅमिली के नाम” इतकंच नाही तर त्या पत्रासोबत बंदुकीच्या दोन गोळ्या सुद्धा ठेवण्यात आल्या होत्या. हे पत्र वाचताच संतोष साबळे यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी लगेच स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली.

कोण आहेत संतोष साबळे

संतोष साबळे पालघर जिल्ह्यातील एका शाळेत शिक्षक आहेत. तसेच महाराष्ट्र वारकरी महामंडळ या संस्थेचे ते सभासद सुद्धा आहेत. साबळे समाज कार्यात सुद्धा तितकेच पुढे असतात. दहिसर परिसरात चालत असलेल्या गैरेकामांबद्दल साबळे यांनी अनेक तक्रारी केल्या आहेत.

2015 मध्ये साबळे यांच्यावर नालासोपारा पोलीस स्टेशन येथे पॉक्सो अंतर्गत गुन्हा सुद्धा नोंदवण्यात आला होता, मात्र आपण समाजकार्य करतो आणि हे काम थांबवण्यासाठी सूडबुद्धीने आणि कट रचून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं साबळे यांनी सांगितलं.ट

जीवाला धोका असल्याची भीती

हे पत्र आणि बंदुकीच्या गोळ्या कोणी पाठवले, याबद्दल साबळे यांना काहीच कल्पना नाही. मात्र त्यांच्या जीवाला धोका असल्याची भीती त्यांनी त्यांच्या तक्रारीत व्यक्त केली आहे.

साबळे यांना जे धमकीचं पत्र पाठवण्यात आलं ते एका लाकडी बॉक्समध्ये त्यांच्या घराच्या दरवाजा बाहेर ठेवण्यात आलं होतं. हे पत्र पोस्टाने पाठवलं गेलं नाही, मात्र यामागे नेमकं कोण आहे आणि त्यांनी हे कृत्य का केलं, याचा पोलिस आणि गुन्हे शाखा हे दोघेही समांतर तपास करत आहेत. कलम 506(2) आणि 507 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला तपास सुरु केला आहे.

संबंधित बातम्या :

MU bomb hoax | मुंबई विद्यापीठाला बॉम्बस्फोटाची धमकी, ईमेल पाठवणारा निघाला बीकॉमचा विद्यार्थी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI