Mumbai Murder | ट्रीटमेंटसाठी तीन लाख खर्च करण्यावरुन वाद, मुंबईकर सूनेने सासूचा गळा आवळला

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Dec 16, 2021 | 12:25 PM

13 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. सासू-सून मुंबईतील धारावी क्रॉस रोड परिसरातील आंबेडकर शाळेजवळ राहतात. घरातच सुनेने सासूची हत्या केल्याचा आरोप आहे.

Mumbai Murder | ट्रीटमेंटसाठी तीन लाख खर्च करण्यावरुन वाद, मुंबईकर सूनेने सासूचा गळा आवळला
'मोक्ष' प्राप्तीचा येडा नाद, लेकरं बाळं, बायको जीवानीशी बाद, एकाच घरात 5 मृतदेह

मुंबई : सासूची हत्या केल्याप्रकरणी मुंबईत सुनेला अटक (Daughter in law killed Mother in law) करण्यात आली आहे. सासूच्या उपचारासाठी लागणाऱ्या पैशांवरुन वाद झाल्यानंतर सुनेने सासूचा जीव घेतल्याचा आरोप आहे. 61 वर्षीय महिलेच्या खून प्रकरणात मंगळवारी 37 वर्षीय विवाहितेला अटक करण्यात आली.

13 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. सासू-सून मुंबईतील धारावी क्रॉस रोड परिसरातील आंबेडकर शाळेजवळ राहतात. घरातच सुनेने सासूची हत्या केल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

शांती मुरुगन (Shanti Murgan) असं 37 वर्षीय आरोपी सुनेचं नाव आहे. परिसरातील रहिवाशांकडे ती घरकाम करते. तिचा पती आचाऱ्याची कामं करतो. तर त्यांना 15 आणि 18 वर्षांच्या दोन मुली आहेत. 61 वर्षीय मयत सासूचं नाव अँटनी मुथुस्वामी (Antony Muthuswamy) होतं.

उपचाराच्या पैशांवरुन सासू-सुनेत वाद

सासूच्या उपचारांच्या खर्चावरुन गेल्या काही दिवसांपासून शांती आणि तिच्या नवऱ्यामध्ये वाद सुरु होते. सासूच्या आजारपणावर 3 लाख रुपये खर्च होणार होता. शांतीचा नवरा आणि सासू यांना तो पैसा उपचारांसाठी वापरायचा होता. तर शांतीला ते पैसे दोन्ही मुलींच्या भविष्यासाठी राखून ठेवायचे होते, अशी माहिती धारावी पोलिसांनी दिली.

भांडणानंतर सासूचा गळा आवळला

घटनेच्या वेळी शांतीच्या दोन्ही मुली आणि नवरा घरी नव्हते. त्यावेळी सासू-सुनेत पुन्हा जोरदार भांडण झालं. त्यानंतर दोघींमध्ये बाचाबाची झाली. अखेर दोरखंडाने गळा आवळून तिने सासूचा जीव घेतला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सुरुवातीला, सासू बाथरुममध्ये पडल्याने मृत्युमुखी पडली, असा बनाव शांतीने केला होता. मात्र सायन हॉस्पिटलमध्ये झालेल्या पोस्टमार्टमचा रिपोर्ट आल्यानंतर सासूचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाल्याचंस स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी शांतीची कसून चौकशी केली आणि तिला बेड्या ठोकल्या.

संबंधित बातम्या :

पोरी, तुझा बाप कर्जबाजारी झालाय, गळफास घेतोय, लवकर मातीला ये.. म्हणत त्यानं जीव संपवला…

Bhiwandi Crime | 14 वर्षीय मोलकरणीवर जंगलात अत्याचार, भिवंडीत मालकाला अटक

MBBS ची विद्यार्थिनी दोन आठवड्यांपासून मुंबईतून बेपत्ता, ‘त्या’ सेल्फीतला तरुण म्हणतो…

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI