नवी मुंबईत रिक्षा चोरणारी जोडगोळी जेरबंद, चोरीच्या सहा गुन्ह्यांची उकल

नवी मुंबईत रिक्षा चोरणारी जोडगोळी जेरबंद, चोरीच्या सहा गुन्ह्यांची उकल
नवी मुंबईत रिक्षा चोरणारे जेरबंद


नवी मुंबई : नवी मुंबईत रिक्षा चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत सहा गुन्ह्यांची उकल झाली आहे. आरोपी हे अभिलेखावरील असल्याचेही समोर आले आहे. अक्षय मोहिते आणि रोहित केसरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

काय आहे प्रकरण?

शीव-पनवेल महामार्गावर सीबीडी उड्डाणपुलाखाली लावलेल्या रिक्षात एक व्यक्ती बसला होता. त्याच्याकडे गस्त पोलिसांची नजर गेली. अनेक तास झाले तरी तो रिक्षात थांबल्याने त्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी त्याला “कोण तू? रिक्षा कोणाची?” असे प्रश्न विचारल्यानंतर तो गडबडला. संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता रिक्षा चोरीची असल्याचे त्याने मान्य केले. तसेच स्वतःचे नाव अक्षय असून रिक्षा चोरीत त्याचा मित्र रोहित याचाही सहभाग असल्याची माहिती दिली.

चोरी केलेल्या दोन रिक्षा सापडल्या

या माहितीच्या आधारावर रोहित यालाही पोलिसांनी कामोठे येथून अटक केली. दोघांची चौकशी केली असता सीबीडी, सानपाडा, आंबोली व मानपाडा येथील गुन्ह्यांची उकल झाली असून अन्य ठिकाणी चोरी केलेल्या दोन रिक्षा मिळून आल्या आहेत. अटक आरोपींकडून पोलिसांनी आतापर्यंत 2 लाख 80 हजार रुपये किमतीच्या चार रिक्षाही जप्त केल्या आहेत.

या बाबत अधिक माहिती देताना पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले की, आरोपी हे रिक्षा चोरीत सराईत असून रिक्षा चोरून त्या वापरत होते व स्वस्तात ग्राहक आले की विकत असत. त्यांनी कदाचित भंगारात रिक्षा विकल्याचा संशय आहे, या बाबत अधिक तपास सुरू आहे.

16 सप्टेंबरपर्यंत पोलिस कस्टडी

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीबीडी पोलीस ठाणे श्री अनिल पाटील, पोलिस निरीक्षक गुन्हे उमेश गवळी यांनी केलेल्या मार्गदर्शन आणि सूचनांप्रमाणे सीबीडी पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अधिकारी सपोनि पवन पाटील, पोउपनि श नितीन सांगळे, पोलीस नाईक संदीप फड, अमोल ठाकरे, प्रमोद वाघ, संदीप बंडगर, दत्तात्रय कराड, प्रमोद साबळे, पोलीस शिपाई नवनाथ पाटील व पवन पाटील यांनी केलेली आहे. गुन्ह्यातील आरोपी यांना दिनांक 16 सप्टेंबर 2021 पर्यंत पोलिस कस्टडी रिमांड असून त्यांच्याकडून नवी मुंबईतील आणखी रिक्षा चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे

संबंधित बातम्या :

दागिने, वस्तू, ऑटो रिक्षा, कार, नवी मुंबई पोलिसांनी चोरी गेलेल्या 1 कोटी रुपयांच्या नागरिकांना परत केल्या

नाशिकमध्ये मंदिरांसह घरांमध्ये चोरी, पकडण्यासाठी तब्बल 48 रिक्षाचालकांची पोलिसांकडून चौकशी, शेवटी बंटी-बबलीला बेड्या

Video: दूध चोरीसाठी पुण्यात भलताच फंडा, रिक्षातून येणाऱ्या चोरट्याकडून साडे पाचशे लिटर दूध लंपास

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI