AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CCTV VIDEO | वसई स्टेशनवर वृद्धा चालत्या लोकलसमोर उभी राहिली, आणि…

संबंधित 60 वर्षीय महिला मुंबईजवळच्या नालासोपारा भागातील राहणारी आहे. पतीचं काही वर्षांपूर्वीच निधन झालं आहे. तर मुलगा तिला सोडून पुण्यात राहतो. त्यामुळे नैराश्यातून तिने आपलं जीवन संपवण्याचा विचार केला असल्याचे समोर आले आहे.

CCTV VIDEO | वसई स्टेशनवर वृद्धा चालत्या लोकलसमोर उभी राहिली, आणि...
वसईत वृद्ध महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
| Edited By: | Updated on: Sep 12, 2021 | 8:42 AM
Share

वसई : मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे वसई रोड रेल्वे स्थानकात एका 60 वर्षीय महिलेला जीवदान मिळाले आहे. पतीनिधनाचे दुःख आणि परगावी राहणारा मुलगा या कारणांमुळे आलेल्या नैराश्यातून महिला आयुष्य संपवण्याच्या तयारीत होती. मात्र मोटरमनने वेळीच गाडी थांबवली, त्यानंतर रेल्वे पोलिसांनी धावत जाऊन तिला ट्रॅकवरुन बाजूला नेले.

नैराश्यातून जीवन संपवण्याचा विचार

संबंधित 60 वर्षीय महिला मुंबईजवळच्या नालासोपारा भागातील राहणारी आहे. पतीचं काही वर्षांपूर्वीच निधन झालं आहे. तर मुलगा तिला सोडून पुण्यात राहतो. त्यामुळे नैराश्यातून तिने आपलं जीवन संपवण्याचा विचार केला असल्याचे समोर आले आहे.

वसई रोड रेल्वे स्थानकात डहाणू-अंधेरी या लोकलसमोर शनिवारी सकाळी 10 वाजून 01 मिनिटांनी ही घटना घडली आहे. ही घटना रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

नेमकं काय घडलं?

वसई रोड रेल्वे स्थानकात ही महिला रेल्वे ट्रॅकवर आलेली, पण समोरुन आलेल्या लोकल ट्रेनची गती कमी असल्याने मोटरमनने गाडी थांबवून हॉर्न वाजवला. त्यामुळे समोरचे दृश्य पाहून प्लॅटफॉर्मवर ड्युटीवर असलेल्या जीआरपीचे पोलीस कर्मचारी एकनाथ नाईक हे धावत गेले आणि त्या महिलेला ट्रॅकच्या बाजूला काढून तिला जीवदान दिले आहे.

महिलेची रवानगी वृद्धाश्रमात

सध्या रेल्वे पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन तिची रवानगी वृद्धाश्रमात केली आहे. ती मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पाहा व्हिडीओ :

साताऱ्यात नवविवाहित तरुणाचा टाकीवरुन आत्महत्येचा प्रयत्न 

दुसरीकडे, सातारा नगरपालिकेच्या समोर असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला होता. गुरुवार पेठ भागात राहणाऱ्या या तरुणाने अक्षरशः शोले स्टाईल थरार केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याला वेळीच सुखरुप खाली उतरवण्यात यश आले.

घटनेच्या अवघ्या चार दिवसांपूर्वी या तरुणाचे लग्न झाले होते. मात्र कौटुंबिक वादामुळे मानसिक ताण निर्माण होऊन तो पाण्याच्या टाकीवर चढला आणि त्यातून त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तरुण थेट पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. या घटनेची माहिती मिळताच परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. पोलिसांनी तरुणाला समजावून त्याला खाली उतरवले. त्याचे व्यवस्थित समुपदेशन करुन त्याला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले

संबंधित बातम्या :

चार दिवसांपूर्वी विवाह, साताऱ्यातील तरुणाचा पाण्याच्या टाकीवरुन आत्महत्येचा प्रयत्न

आई-बहिणीला इंजेक्शन देऊन संपवलं, आत्महत्येचा प्रयत्न करणारी 30 वर्षीय डॉक्टर बचावली

ब्रेकअपचं दुःख, मुंबईचा तरुण एक्स गर्लफ्रेण्डच्या गावात, उंच टेकडीवरुन जीव देणार तोच…

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.