वसईत महिन्याभराच्या काळात चौथा मृतदेह सापडला, किल्लाबंदर परिसरात पस्तिशीतील तरुणाची डेड बॉडी

एकाच महिन्यात (जुलै) तीन मृतदेह वसई पोलीस ठाणे हद्दीत सापडले होते. तर महिन्याभराच्या काळात सापडलेला हा चौथा मृतदेह आहे. याआधी, दोन मृतदेह हे वसई पाचूबंदर समुद्र किनाऱ्यावर तर एक मृतदेह भुईगाव समुद्र किनाऱ्यावर सापडले होते

वसईत महिन्याभराच्या काळात चौथा मृतदेह सापडला, किल्लाबंदर परिसरात पस्तिशीतील तरुणाची डेड बॉडी
वसईत किल्ले बंदर भागात पुरुषाचा मृतदेह सापडला

वसई : वसईच्या किल्लाबंदर परिसरात पुन्हा एक मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. औलू जेट्टीवर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.

वसईच्या किल्लाबंदर परिसरात मच्छिमार समुद्रात मच्छिमारीसाठी जात असताना त्यांना हा मृतदेह किनाऱ्यावर दिसला. मच्छिमारांनी त्वरित वसई पोलिसांचा याची माहिती दिली. वसई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची पाहणी करुन पंचनामा केला आहे. 35 ते 40 वर्ष वयोगटातील पुरुषाचा हा मृतदेह आहे. वसई पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला आहे.

महिन्याभराच्या काळात चौथा मृतदेह

एकाच महिन्यात (जुलै) तीन मृतदेह वसई पोलीस ठाणे हद्दीत सापडले होते. तर महिन्याभराच्या काळात सापडलेला हा चौथा मृतदेह आहे. याआधी, दोन मृतदेह हे वसई पाचूबंदर समुद्र किनाऱ्यावर तर एक मृतदेह भुईगाव समुद्र किनाऱ्यावर सापडले होते. 15 जुलैला अनोळखी पुरुषाचा मृतदेह किल्लाबंदरला सापडला होता. त्याआधी 11 जुलैला ममता पटेल या बेपत्ता असणाऱ्या महिलेचा किल्ला बंदर येथे मृतदेह सापडला होता. ममता पटेल या मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या आणि त्या बेपत्ता झाल्या होत्या. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह सापडला होता. तर 26 जुलै रोजी सुटकेसमध्ये धडापासून वेगळा असलेला महिलेचा मृतदेह आढळला होता.

सुटकेसमध्ये मृतदेह

याआधी, वसईच्या भुईगाव समुद्रकिनारी एका सुटकेसमध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. या महिलेची हत्या करुन, मुंडकं धडापासून वेगळं करून तो मृतदेह सुटकेसमध्ये भरुन समुद्रात फेकलेला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. वसईच्या भुईगाव समुद्र किनारी 26 जुलै रोजी दुपारी हा मृतदेह मिळाला होता. सुटकेसमध्ये मृतदेह कुजलेल्या स्थितीत असून मृतदेहाच्या अंगात ड्रेस घातलेला होता.

वसईतील बीचवर नवविवाहितेचा मृतदेह

दरम्यान, मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या 30 वर्षांच्या महिलेचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना 11 जुलैला उघडकीस आली होती. वसईच्या किल्ला बंदर समुद्र किनाऱ्यावर ममता पटेल हिचा मृतदेह सापडला होता. ती चार दिवसांपासून बेपत्ता होती. ममता पटेल वसईच्या एव्हरशाईन परिसरात राहत होती. ती मूळ गुजरातमधील नवसारी येथील रहिवासी होती. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी तिचा विवाह झाला होता.

संबंधित बातम्या :

वसई किनाऱ्यावर सुटकेसमधून दुर्गंध, उघडून पाहिलं तर धडापासून वेगळा असलेला महिलेचा मृतदेह

आधी विवाहितेचा मृतदेह, आता वसईतील त्याच बीचवर पुरुषही मृतावस्थेत, हातावर नाव गोंदवलेलं

मॉर्निंग वॉकहून परतलीच नाही, वसईतील बीचवर नवविवाहितेचा मृतदेह आढळला

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI