पती परदेशी, वसईत विवाहितेची राहत्या घरी हत्या, कौटुंबिक वादातून खुनाचा संशय

पती परदेशी, वसईत विवाहितेची राहत्या घरी हत्या, कौटुंबिक वादातून खुनाचा संशय
वसईत विवाहितेची हत्या

धारदार शस्त्राने वार करुन विवाहित महिलेची राहत्या घरी हत्या करण्यात आली आहे. हत्येचं नेमकं कारण अस्पष्ट असलं तरी कौटुंबिक वादातून महिलेचा खून झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

विजय गायकवाड

| Edited By: अनिश बेंद्रे

May 17, 2022 | 7:25 AM

वसई : विवाहित महिलेची हत्या (Married Lady Murder) झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईलगतच्या वसई शहरात (Vasai Crime News) ही घटना घडल्याची माहिती आहे. धारदार हत्याराने वार करुन महिलेची हत्या करण्यात आली आहे. राहत्या घरीच विवाहिता मृतावस्थेत आढळली. ही हत्या कौटुंबिक वादातून झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणात एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पालघर जिल्ह्यातील वसई शहराच्या पूर्व भागातील एव्हरशाईन परिसरातील एका इमारतीत ही हत्या झाली आहे. वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?

धारदार शस्त्राने वार करुन विवाहित महिलेची राहत्या घरी हत्या करण्यात आली आहे. हत्येचं नेमकं कारण अस्पष्ट असलं तरी कौटुंबिक वादातून महिलेचा खून झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

महिला घरी एकटीच, पती परदेशी

संगीता रिबेलो असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला एकटीच आपल्या घरात राहत असून तिचा पती हा बाहेर देशात राहत असल्याची माहिती ही पोलीस सूत्रांकडून समजली आहे.

हे सुद्धा वाचा

कौटुंबिक वादातून हत्येचा संशय

आता ही हत्या कौटुंबिक वादातून आहे की याला अन्य काही कारण आहे. हे मात्र अधिकृत पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे. हत्या कोणी केली हे अद्याप पोलिसांनी सांगितलं नसलं तरी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें