हॉटेलला एकटी ये, रात्रभर थांब, तुझी लाईफ बनवतो, ‘त्या’ अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा थरारक अनुभव

त्यांनी मला कोणती दारु घेणार, असं विचारलं. पुढे आनंद नगरला घेऊन गेले. तिथून अलका फार्म हाऊसला नेलं. तिथे मनसेची टीम पोहोचली आणि त्यांनी मला वाचवलं, असं अभिनेत्रीने सांगितलं.

हॉटेलला एकटी ये, रात्रभर थांब, तुझी लाईफ बनवतो, 'त्या' अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा थरारक अनुभव
मनसेची पत्रकार परिषद
Follow us
| Updated on: Aug 02, 2021 | 1:14 PM

मुंबई : फिल्म इंडस्ट्रीमध्ये करिअर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक नवोदित सिने अभिनेत्रींना कास्टिंग काऊचचा सातत्याने सामना करावा लागत आहे. नवोदित अभिनेत्रीला चित्रपटात मुख्य भूमिका देण्याच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी करणाऱ्या निर्मात्याला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कपडे फाटेस्तोर चोपल्याचा प्रकार गेल्याच आठवड्यात ठाण्यात समोर आला होता. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, कार्यध्यक्षा शालिनी ठाकरे आणि मनचिसेकडे तक्रार करणाऱ्या नवोदित अभिनेत्रीने माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली.

काय अनुभव आला अभिनेत्रीला?

“29 जुलै रोजी राहुल तिवारीचा मला फोन आला. एका हिंदी चित्रपटात रोल देत असल्याचं तो म्हणाला. मात्र प्रोड्युसरला खुश करावं लागेल, असं तो म्हणताच मी नकार दिला. पण पुन्हा वारंवार फोन येत होते. मी कुटुंबासोबत चर्चा केली आणि मुद्दाम होकार देत धडा शिकवायचा निर्णय घेतला” असं अभिनेत्रीने सांगितलं.

“हातात बंदूक, चार तास फिरवलं”

“दुसऱ्या दिवशी मला फाऊंटन हॉटेलला बोलावण्यात आलं. हॉटेलला एकटी ये, रात्रभर थांबावं लागेल, तुझी लाईफ बनवतो, असं तो म्हणाला. आम्ही रिक्षाने तिकडे गेलो. मला त्या लोकांनी त्याच्या रिक्षाने पुढे नेलं. नंतर त्याच्या गाडीत बसवलं. त्याच्या हातात बंदूक होती. मला चार तास फिरवत होते. मी लाईव्ह लोकेशन शेअर केलं होतं. पुढे त्यांनी मला कोणती दारु घेणार, असंही विचारलं. पुढे आनंद नगरला घेऊन गेले. तिथून अलका फार्म हाऊसला नेलं. तिथे मनसेची टीम पोहोचली आणि त्यांनी मला वाचवलं” असं अभिनेत्रीने सांगितलं.

सर्व नवोदित अभिनेत्रींनी अशा लोकांना धडा शिकवला पाहिजे. पोलीस स्टेशनला गेले, तर पोलिसांनी उलट प्रश्न विचारले. सेटलमेंट करणार का, असं विचारत होते, पोलिसांनी काही मदत केली नाही, असा आरोपही तक्रारदार तरुणीने केला.

अमेय खोपकर काय म्हणाले?

पोलीस आम्हाला प्रश्न विचारत आहेत. अशा नराधमाला शिक्षा दिली पाहिजे. जो निर्माता आहे त्याच्यावर बलात्काराची केस आहे. पुढे कोणत्याही मुलीला त्रास झाला, तर त्यांना मनसे हे होऊ देणार नाही. या हिंदी भाषिक निर्मात्यांनी निघून जावं. पोलिसांनी जी कलमं लावली आहेत, यात त्यांना जामीन मिळणार असं वाटतं, पण हे बाहेर आले तर आम्ही हात पाय तोडू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला.

तर, अशा अनेक मुलींना त्रास होत आहे. या मुलीने पुढे येऊन ही भूमिका घेतली हे योग्य आहे, पोलिसांकडे जाऊ नका, आमच्याकडे आधी या, असा सल्लाच मनचिसेच्या कार्यध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी दिला.

पाहा संपूर्ण पत्रकार परिषद :

मारहाणीचा व्हिडीओ बघा :

संबंधित बातम्या :

VIDEO : नवोदित अभिनेत्रीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या निर्मात्यांना मनसेचा चोप

(MNS Leader Ameya Khopkar talks on Newcomer Actress facing Casting Couch Producers beaten up)

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.