मुंबईत हायप्रोफाईल वस्तीत Ambergris ची खरेदी-विक्री, पोलिसांकडून सापळा रचत टोळीचा पर्दाफाश

गुन्हे शाखेने बेकायदेशीरपणे व्हेल उलटी (Whale Vomit) म्हणजेच अंबरग्रिसची (Ambergris) खरेदी-विक्री करणार्‍या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

मुंबईत हायप्रोफाईल वस्तीत Ambergris ची खरेदी-विक्री, पोलिसांकडून सापळा रचत टोळीचा पर्दाफाश
Ambergris
Follow us
| Updated on: Jul 04, 2021 | 5:36 PM

मुंबई : गुन्हे शाखेने बेकायदेशीरपणे व्हेल उलटी (Whale Vomit) म्हणजेच अंबरग्रिसची (Ambergris) खरेदी-विक्री करणार्‍या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 6 किलो अ‍ॅम्बरग्रिस जप्त केले. ज्याचे बाजारमूल्य 6 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. हे दोन्ही आरोपी अ‍ॅम्बरग्रिसचा पुरवठा करण्यासाठी मुंबईच्या पवई भागात आले होते. (Mumbai CID arrested Two with Ambergris worth Rs 6 crore)

मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 10 ला त्यांच्या गुप्त सूत्रांकडून माहिती मिळाली होती की, पवई परिसरातील एका कारमधील दोन लोक अ‍ॅम्बरग्रिस खरेदी विक्री करणार आहेत. माहिती मिळताच मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला. थोड्याच वेळाने एक गाडी आली आणि तिथेच थांबली. संशयाच्या आधारे गुन्हे शाखेने कार थांबवून शोध घेतला असता त्यांच्याकडून जवळपास 6 किलो अ‍ॅम्बरग्रिस जप्त करण्यात आले आहे. यानंतर कारमध्ये बसलेल्या दोन्ही आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार अ‍ॅम्बरग्रिस हे परफ्युम आणि अनेक औषधे तयार करण्यात वापरले जाते. ते खूप महाग किंमती विकले जाते. या दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर गुन्हे शाखा हे तपास करत आहे की, आरोपी याचा पुरवठा कोणाला करणार होते. या टोळीत इतर लोक कोण आहेत? याचा शोध शुरु आहे. यापूर्वीदेखील मुंबईत अ‍ॅम्बरग्रिसची विक्री करणारी टोळी पोलिसांनी पकडली होती.

इतर बातम्या

एका क्षणात झाला करोडपती! मच्छिमाराच्या हाती काय लागलं हे पाहून तुम्हीही थक्क व्हाल

कर्जाचा डोंगर, वाढत्या अपेक्षा… मला माफ करा; MPSC उत्तीर्ण स्वप्नील लोणकरची सुसाईड नोट जशीच्या तशी…

ऑनलाईन शस्त्रास्त्र तस्करी, 49 तलवारींसह धारदार शस्त्रं जप्त, औरंगाबादेत आरोपी ताब्यात

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.