‘हॅलो, मी गैता जैन बोलतेय’ मुंबईत आमदाराच्या नावाने खंडणी वसुली, महिलेसह तिघांना अटक

'हॅलो, मी गैता जैन बोलतेय' मुंबईत आमदाराच्या नावाने खंडणी वसुली, महिलेसह तिघांना अटक
गीता जैन

पुरुष आरोपी आपण आमदार गीता जैन यांचे पीए असल्याचं सांगून पैशांची मागणी करायचे, तर महिला आरोपी 'मी आमदार गीता जैन आहे' असे सांगत डोनेशनची मागणी करायची.

रमेश शर्मा

| Edited By: अनिश बेंद्रे

Dec 22, 2021 | 7:42 AM

मीरा भाईंदर : मीरा भाईंदर विधानसभेच्या अपक्ष आमदार गीता जैन (Geeta Jain) यांच्या नावाचा गैरवापर करुन खंडणी गोळा करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात आले आहे. टोळीच्या तीन सदस्यांना काशीमीरा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचाही समावेश आहे.

काय आहे प्रकरण?

पुरुष आरोपी आपण आमदार गीता जैन यांचे पीए असल्याचं सांगून पैशांची मागणी करायचे, तर महिला आरोपी ‘मी आमदार गीता जैन आहे’ असे सांगत डोनेशनची मागणी करायची.

हॉटेल मालकांनी डांबून ठेवलं

आरोपी काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या दिल्ली दरबार हॉटेलमध्ये आमदार गीता जैन यांच्या नावाने पैसे मागण्यासाठी गेले असताना हॉटेल मालकांनी त्यांना डांबून ठेवले आणि याची माहिती पोलिसांना दिली.

तिघांना अटक, तपास सुरु

काशीमीरा पोलिसांनी तिघा आरोपींना अटक करुन पुढील चौकशी सुरु केली आहे. आरोपींनी आणखी किती ठिकाणी, किती जणांना आमदार गीता जैन यांच्या नावाखाली खंडणी वसुली केली आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

फेक ऑडिओ क्लीप

याआधी, आमदार गीता जैन यांच्या आवाजातील नकली ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याला जुलै महिन्यात अटक केली होती. गीता जैन यांनी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी रंजू झा या महिलेला अटक करण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

आमदार गीता जैन यांच्या नावे फेक WhatsApp नंबर, स्थानिकांकडे पैशांची मागणी

आमदाराच्या आवाजातील नकली ऑडिओ क्लिप व्हायरल, भाजप पदाधिकारी महिलेला अटक

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें