पाच वर्षांपासून मुंबईत सक्रिय, नायजेरियन ड्रग्स तस्कराला बेड्या, तब्बल 4 कोटींचे कोकेन जप्त

अटक करण्यात आलेली आरोपी हा मागील पाच वर्षांपासून ड्रग्स तस्करीच्या व्यवसायात सक्रिय आहे. कोणाला शंका येऊ नये म्हणून या आरोपीने त्याच्या एका मित्राला हाताशी धरुन कपड्याचा व्यवसाय सुरु केला. नंतर याच मित्राला ड्रग्स तस्करीमध्ये सोबत घेतले. 2016 पासून हा नायजेरियन नागरिक भारतात आला.

पाच वर्षांपासून मुंबईत सक्रिय, नायजेरियन ड्रग्स तस्कराला बेड्या, तब्बल 4 कोटींचे कोकेन जप्त
DRUG MUMBAI
Follow us
| Updated on: Aug 27, 2021 | 5:24 PM

मुंबई : अंमली पदार्थविरोधी पथकाच्या वांद्रे युनिटने मोठी कामगिरी केली आहे. या पथकाने एका नायजेरियन ड्रग्स तस्कराला तब्यात घेतले असून त्याच्याकडून तब्बल 3 कोटी 90 लाख रुपयांचे कोकेन ड्रग्स जप्त केले आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अमली पदार्थविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. याबाबत अमली पदार्थविरोधी पथकाचे डीसीपी दत्ता नलावडे यांनी अधिक माहिती दिली आहे. (Mumbai NCB arrests nigerian drug smuggler seized 3 crore of Cocaine)

एनसीबीने नायजेरियन नागरिकाला ताब्यात घेतले

मिळालेल्या माहितीनुसार ड्रग्स तस्करीसाठी मुंबईत एक नायजेरियन नागरिक येणार असल्याची माहिती एनसीबी विभागाला मिळाली. ही गुप्त माहिती मिळताच एनसीबी विभागाने सापळा रचून या अधिकाऱ्याला पकडण्याचे ठरवले. त्यानुसार एनसीबीने कारवाई करुन या नायजेरियन नागरिकाला ताब्यात घेतले. या कारवाईत त्याच्याकडून तब्बल 1 किलो 300 ग्रॅन कोकेन ड्रग्स जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्सचे मूल्य तब्बल 3 कोटी 90 लाख रुपये आहे.

2016 पासून ड्रग्स तस्करीमध्ये सक्रिय

अटक करण्यात आलेली आरोपी हा मागील पाच वर्षांपासून ड्रग्स तस्करीच्या व्यवसायात सक्रिय आहे. कोणाला शंका येऊ नये म्हणून या आरोपीने त्याच्या एका मित्राला हाताशी धरुन कपड्याचा व्यवसाय सुरु केला. नंतर याच मित्राला ड्रग्स तस्करीमध्ये सोबत घेतले. 2016 पासून हा नायजेरियन नागरिक भारतात आला. तेव्हापासून हा मुंबईमध्ये सक्रिय असून तो ड्रग्स तस्करी करत आहे. मोहम्मद अली रोडवर त्याने कपड्याचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र त्याचा मुख्य व्यवसाय ड्रग्स तस्करी हाच होता.

ड्रग्स तस्करीचे मोठे धागेदोरे होती लागण्याची शक्यता

सध्या अटक करण्यात आलेला नायजेरियन नागरिक अमली पदार्थविरोधी पथकाच्या ताब्यात असून त्याची सखोल चौकशी केली जात आहे. त्याच्या अटकेनंतर मुंबईमधील ड्रग्स तस्करीचे मोठे जाळे हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इतर बातम्या :

पुण्यात महिलेला वडापाव खाण्याची इच्छा पडली 8 लाखांना! रक्षबंधनाच्याच दिवशी घडली घटना

पत्नीने दरवाजा न उघडल्याचा राग, नाराज नवऱ्याने ओढणीने गळा आवळून जीव घेतला

दारुच्या गुत्त्यावर किरकोळ वाद, नागपुरात तिघा मित्रांकडून तरुणाची हत्या

(Mumbai NCB arrests nigerian drug smuggler seized 3 crore of Cocaine)

Non Stop LIVE Update
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.