AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांना कोर्टाचा दणका, थेट तुरुंगात पाठवण्याचे आदेश

प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना कोर्टाने दणका दिला आहे. डीएचएफएल (DHFL) आणि येस बँक घोटाळा (Yes Bank Scam) प्रकरणी अटकेत असलेले अविनाश भोसले यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांना कोर्टाचा दणका, थेट तुरुंगात पाठवण्याचे आदेश
| Edited By: | Updated on: Jan 25, 2023 | 6:39 PM
Share

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना कोर्टाने दणका दिला आहे. डीएचएफएल (DHFL) आणि येस बँक घोटाळा (Yes Bank Scam) प्रकरणी अटकेत असलेले अविनाश भोसले यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पण कोर्टाने अविनाश भोसले यांना तीन दिवसांत तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले आहेत. तीन दिवसात जे.जे. हॉस्पिटलमध्ये सर्व तपासणी, चाचणी पूर्ण करून भोसले यांना तुरुंगात पाठवावे, असा आदेश मुंबई सेशन्स कोर्टातील विशेष पीएमएलए कोर्टाने दिला आहे. अविनाश भोसले यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सीबीआयच्या वतीने अविनाश भोसले यांच्या उपचाराला विरोध केला जातोय.

अविनाश भोसले यांच्या तपासणी करिता विशेष पथक स्थापन करण्याची मागणी करण्यात आली होती. सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये सुरू असलेल्या उपचाराला सीबीआयने आक्षेप घेतला होता.

पुण्याचे बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना 26 मे 2022 रोजी सीबीआयकडून अटक करण्यात आलं होतं. डीएचएफएल घोटाळ्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

हे मूळ प्रकरण 2018 सालातील आहे. त्यावर्षी एप्रिल ते जूनच्या काळात हजारो कोटी रुपये एका खआत्यातून दुसऱ्या खात्यात वळवण्यात आले होते. त्यात मोठ्या उद्योजकांच्या कंपन्यांचा सहभाग होता. यात अविनाश भोसले, संजय छाब्रिया, बलवा व गोएंका यांचा समावेश होता.

या प्रकरणी गेल्यावर्षी एप्रिलच्या अखेरीस सीबीआने छापेमारीही केली होती. या प्रकरणाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. कारण अविनाश भोसले यांचे अनेकांशी राजकीय संबंध असल्याची चर्चा होती.

काय आहे नेमकं प्रकरण?

येस बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राणा कपूर यांनी डीएचएफएलमध्ये 3700 कोटी रुपये कर्जऱोख्यांतून गुंतवले होते. यात राणा यांना 600 कोटींची दलाली मिळाल्याचे समोर आले होते. त्यानंतर डीएचएफएलने हे पैसे छाब्रिया यांच्या रेडियस ग्रुप, भोसले यांच्या इन्फ्रा लिमिटेड आणि बलवा आणि गोएंकाच्या कंपनीत वळते केले होते. त्यानंतर छाब्रियांना अटक करताच भोसले, बलवा आणि गोएंका यांच्यावर सीबीआयने छापेमारी केली होती. डीएचएफएल म्हणजेच दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने येस बँकेकडून 750 कोटींचे कर्ज घेतले होते. पण त्याचा वापरच करण्यात आला नाही, असे तपासात समोर आले होते.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.