चहाच्या बंद दुकानात घडला थरार, शटर उघडताच जे दिसलं त्याने सर्वच हादरले; ‘त्या’ तीन मित्रांमध्ये काय घडलं?

नालासोपाऱ्यात अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तीन मित्रांमध्ये झालेल्या हाणामारीत एका मित्राचा मृत्यू झाला आहे. तर दोघे जखमी आहेत. एका बंद खोलीत हा थरार घडल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.

चहाच्या बंद दुकानात घडला थरार, शटर उघडताच जे दिसलं त्याने सर्वच हादरले; 'त्या' तीन मित्रांमध्ये काय घडलं?
achole policeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 18, 2023 | 7:37 AM

नालासोपारा : मैत्रीचं नातं प्रचंड अतूट असतं. रक्ताच्या नात्यापेक्षाही हे नातं अत्यंत अतूट आणि जवळचं असतं. मित्र एकमेकांच्या संकटात धावून येतात. शिवाय संकट आलं तर एक मित्र दुसऱ्या मित्राचाच धावा करतो. म्हणूनच मित्र हा वणव्यात गारव्यासारखा असल्याचं म्हटलं जातं. पण हेच मित्र एकमेकांच्या जीवावर उठतात तेव्हा…? नालासोपाऱ्यातही असंच काहीसं घडलं. तीन मित्रांची अतूट मैत्री एका भलत्याच वळणावर गेली. त्यात एकाला आपला जीव गमवावा लागलाय. तर दोनजण गंभीर जखमी आहेत. काय झालं? कशामुळे झालं? याचं कोडं पोलिसांनाही पडलं आहे. पोलीस आता या घटनेचा कसून तपास करत आहेत.

नालासोपाऱ्यात तीन मित्रांच्या भांडणात एका मित्राची हत्या तर दोन जण गंभीर जखमी झाले असल्याची घटना घडली आहे. हा हत्येचा सर्व थरार एका चहाच्या बंद दुकानात काल घडला आहे. यात एका मित्राचा मृत्यू झाल असून दुसरे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे या हत्येचे नेमके कारण काय? भांडण नेमके कशामुळे झाले? हे मात्र रात्री उशिरा पर्यंत स्पष्ट झालेलं नाही. कारण दोन्ही मित्र गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. ते बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे या दोन्ही मित्रांची जेव्हा चौकशी होईल, तेव्हाच चहाच्या बंद दुकानातील थराराचं सत्य बाहेर येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

तिघे आत गेले अन्

रॉनक तिवारी असे मयत तरुणाचे नाव असून किशन झा आणि शिवम दुबे अशी जखमींची नावे आहेत. हे तिघेही एकमेकांचे मित्र असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नालासोपारा पूर्व नागेला तलावा शेजारील गाला नगर शिवशक्ती चाळीत तलावाच्या कॉर्नरलाच जखमी शिवम दुबे याचे नमस्ते टी कॉफी सेंटर आहे. या चहाच्या दुकानात काल दुपारी हे तिन्ही मित्र शटर बंद करून आतमध्ये गेले होते. यावरून त्यांच्यात कशावरून तरी वाद झाला असावा. हे तिघे दुकानाच्या आत गेले, पण परत बाहेर आलेच नाही.

शटर उघडलं अन्…

तिघेही बऱ्याच वेळा पासून बाहेर पडले नाही. आवाज दिला तरी त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद येत नसल्याने आजूबाजूच्यांना संशय आला. त्यांनी या घटनेची पोलिसांना खबर दिली. खबर मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता गॅसच्या बाटल्याचा पाईप कापलेला आढळला. एका रॉडने मृतदेहावर वार झालेले दिसले. हा रॉड कशासाठी आणला होता? मृत तरुणावर या रॉडने वार तर केला नाही ना? असा सवाल निर्माण झाला आहे. पोलीसही त्या अनुषंगाने तपास करत आहेत.

हत्येचं कारण स्पष्ट होईल

नालासोपारा पूर्व आचोळा पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळावरील पुराव्यावरून हत्येचा गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस तपासानंतर ही हत्या प्रेम प्रकरणावरून की पैशाच्या वादातून झाली हे स्पष्ट होईल, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.