AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Kundra : राज कुंद्रांना 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी, डर्टी पिक्चरची पाळंमुळं खोदणार!

पॉर्न फिल्म प्रकरणात अटक करण्यात आलेला बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Raj Kundra : राज कुंद्रांना 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी, डर्टी पिक्चरची पाळंमुळं खोदणार!
Raj Kundra
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 20, 2021 | 2:33 PM
Share

मुंबई : पॉर्न फिल्म प्रकरणात अटक करण्यात आलेला बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राज कुंद्रा आणि कंपनीचा आयटी हेड रायन थोरोपे (Ryan Thorope) या दोघांना मुंबई सत्र न्यायालयाने 23 जुलैपर्यंत कोठडी दिली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) यांना काल अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या पोलीसांच्या गुन्हे शाखेकडून त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे. दिवसभराच्या चौकशीनंतर गुन्हे शाखेनं अटक केली आहे.

यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु झाली असून, पोलिसांनी तपास सुरु केला आहे. या दरम्यान पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे लागले आहेत.

रायनला अटक 

राज कुंद्राच्या अटकेनंतर त्याच्या कंपनीचा आयटी हेड रायन थोरोपे (Ryan Thorope) यालाही रायगडमधून अटक करण्यात आली आहे. रायन थोरोपे हा राज आणि शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) अतिशय जवळचा व्यक्ती आहे.  रायनने अनेक वर्षे राज आणि शिल्पा शेट्टी यांच्या कंपन्या ‘वियान गेमिंग प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘वियान इंडस्ट्रीज लिमिटेड’ या कंपन्यांमध्ये अनेक वर्ष काम केले आहे.

रायनवरही आरोप

राज कुंद्रा यांनी रायनवर अश्लील व्हिडीओ लिंकची तांत्रिक बाब सोपवली होती. हे अश्लील चित्रपटांचे रॅकेट मुंबई ते लंडन कसे चालते, याविषयी रायनला सर्व माहिती होती.

काय आहे प्रकरण?

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा (Raj Kundra) याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्रा अश्लील चित्रपट तयार करण्यासाठी वित्त पुरवठा करत होता. अभिनेत्री गहना वशिष्ठला (Gehana Vasisth) अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक झाल्यानंतर चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत पोहोचले.

गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्राचे नातेवाईक प्रकाश बक्षी यूकेमध्ये राहतात. त्यांची यूके स्थित केनरिन (Kenrin) प्रॉडक्शन हाऊस नावाची कंपनी देखील आहे. प्रकाश बक्षी चेअरमन असलेल्या या कंपनीचे राज कुंद्रा पार्टनरही आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या कुंद्रा या कंपनीचा मालक आणि गुंतवणूकदार आहे. राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत हा केनरिन प्रॉडक्शन हाऊसचा भारतातील प्रतिनिधी होता. ही कंपनी अनेक एजंट्सना अश्लील चित्रपटांची निर्मिती करण्याचे कंत्राट आणि आर्थिक सहाय्य देत असल्याचा आरोप आहे.

मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज कुंद्राने या अश्लील चित्रपट बनवण्याच्या उद्योगात सुमारे 8 ते 10 कोटींची गुंतवणूक केली होती. तसेच, या व्हिडीओंचे शूटिंग भारतात करण्यात आले आणि त्यानंतर वी-ट्रान्सफर मार्गे यूकेला हस्तांतरित केले गेले.

संबंधित बातम्या  

Raj Kundra Controversy : बिटकॉईन घोटाळ्यापासून ते आयपीएल मॅच फिक्सिंगपर्यंत, राज कुंद्राभोवती नेहमीच वादाचं वलय!

Raj Kundra case : मुंबई ते लंडन चालणाऱ्या अश्लील चित्रपट रॅकेटची संपूर्ण माहिती, राज कुंद्राच्या आयटी हेडला अटक

Raj Kundra case : 30-40 अ‍ॅप्स, शेकडो अश्लील व्हिडीओ, भलं मोठं भांडार मुंबई पोलिसांच्या हाती, राज कुंद्रांचा पाय खोलात 

Follow Us
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची...
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची उमेदवारी; बिनविरोध निवड होताच केलं मोठं विधान
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा; म्हणाले, आजचं फोडाफोडीचं...
शिंदे सेनेत प्रवेश...थेट उपसभापती! अहिरांच्या नावावर शिक्कामोर्तब
Vidhanparishad | शिंदे सेनेत प्रवेश... आणि थेट उपसभापती! सचिन अहिरांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात मोठी खळबळ
शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
Sachin Ahir | मी गेल्याशिवाय कळणार नाही...शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदे
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदेंसह ओमराजेदेखील... राजकारणातील हालचाली वाढल्या