इकबाल कासकरचा ताबा एनसीबीला कधी मिळणार? जाणून घ्या दिवसभरात नेमकं काय-काय घडलं

ठाणे मोक्का कोर्टाने एनसीबीकडे इकबाल कासकर याचा ताबा देण्याचे आदेश आज जेलच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत (Thane MCOCA court approves NCB custody of Iqbal Kaskar).

इकबाल कासकरचा ताबा एनसीबीला कधी मिळणार? जाणून घ्या दिवसभरात नेमकं काय-काय घडलं
इक्बाल कासकर
Follow us
| Updated on: Jun 24, 2021 | 9:01 PM

मुंबई : गँगस्टर इकबाल कासकर याचा ताबा मिळवण्याची प्रक्रिया आज (24 जून) पूर्ण झाली आहे. ठाणे मोक्का कोर्टाने एनसीबीकडे इकबाल कासकर याचा ताबा देण्याचे आदेश आज जेलच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. एनसीबी अधिकाऱ्यांना उद्या (25 जून) सकाळी इकबाल कासकर याचा ताबा मिळणार आहे. त्यानंतर त्याला मुंबई एनसीबी कार्यालयात आणलं जाणार आहे (Thane MCOCA court approves NCB custody of Iqbal Kaskar).

नेमकं प्रकरण काय?

एनसीबी अधिकाऱ्यांनी नुकतीच काश्मीर हशीस बाबत कारवाई केली आहे. या कारवाईत 35 किलो हशीस आणि काही लाख रुपये रोकड जप्त केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी काही जण हे पंजाबचे आहेत. या तपासात इकबाल कासकर याचं नाव आल्यानंतर एनसीबी अधिकाऱ्यांनी इकबाल कासकर याचा ताबा मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या. मात्र, यावेळी इकबाल कासकर याचा ताबा मिळण्यास अडचणी येत होत्या (Thane MCOCA court approves NCB custody of Iqbal Kaskar).

इकबाल कासकरचा ताबा मिळवण्यात नेमक्या काय अडचणी आल्या?

इकबाल कासकर हा सध्या जेलमध्ये आहे. त्याला ठाणे जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. जेलमधील एखाद्या आरोपीचा ताबा घ्यायचा असल्यास त्या आरोपीच्या विरोधात ज्या न्यायालयात खटला सुरू आहे त्या न्यायलायाकडून ताबा घेतला जातो. इकबाल कासकर याच्या बाबत संबंधित न्यायालयाचं वॉरंट नसल्याचं जेलच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं.

इकबाल कासकर याचा ताबा घेण्यासाठी एनसीबी अधिकाऱ्यांना बरीच मेहनत करावी लागली. एकूण तीन कोर्टांची कार्यवाही करावी लागली. एनसीबीचा गुन्हा हा भिवंडीतील आहे. एनसीबीचं कार्यालय मुंबईत आहे. तर इकबाल याच्या विरोधात जो खटला सुरू आहे तो ठाणे मोक्का कोर्टात सुरू आहे. यामुळे प्रथम भिवंडी कोर्टाचं वॉरंट घेऊन त्या आधारावर ठाणे मोक्का कोर्टातून इकबाल याचा ताबा लेटर घेण्यात आलं. यानंतर उद्या सकाळी इकबाल याचा जेलमधून ताबा घेतल्यानंतर त्याला स्थानिक कोर्टातून ट्रान्झिस्ट रिमांड घेऊन त्याला मुंबईत आणलं जाणार आहे.

हशीस तस्करीमागे आंतरराष्ट्रीय ड्रग्स स्मगलर?

एनसीबीने जी कारवाई केली आहे ती हशीस बाबातची आहे. हे हशीस काश्मिरातील आहे. आणणारे पंजाबी आहेत. यामुळे या हशीस तस्करीमागे आंतरराष्ट्रीय ड्रग्स स्मगलर तर नाहीत ना असा एनसीबी अधिकाऱ्यांना संशय आहे. त्याच अनुषंगाने हा तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या : 

इकबाल कासकरच्या अडचणीत वाढ, एनसीबी 24 जूनला अटक करणार

समीर वानखेडेंची आणखी एक धडाकेबाज कामगिरी, थेट दाऊदच्या भावाला बेड्या

90 च्या दशकात अंडरवर्ल्डला भिडलेल्या निवृत्त एसीपीचा मुलगा ड्रग्ज प्रकरणात अटकेत

ड्रग्स केक बेकरी प्रकरणात आरोपीला अटक, आफ्रिकन नागरिकाला ड्रग्ज पुरवणारा रिक्षाचालकही गजाआड

Non Stop LIVE Update
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....