इकबाल कासकरच्या अडचणीत वाढ, एनसीबी 24 जूनला अटक करणार

ड्रग्स प्रकरणात एनसीबीचे अधिकारी गुरुवारी (24 जून) इकबाल कासकर याचा ताबा घेणार आहे. कासकर सध्या ठाणे जेलमध्ये आहे.

इकबाल कासकरच्या अडचणीत वाढ, एनसीबी 24 जूनला अटक करणार
एनसीबीची धडक कारवाई; चरस, गांजा हस्तगत, पाच आरोपींना अटक
Follow us
| Updated on: Jun 23, 2021 | 10:22 PM

मुंबई : ड्रग्स प्रकरणात एनसीबीचे अधिकारी गुरुवारी (24 जून) इकबाल कासकर याचा ताबा घेणार आहेत. कासकर सध्या ठाणे जेलमध्ये आहे. एका मोठ्या ड्रग्स रॅकेटचा इकबाल कासकर याच्याशी संबंध असल्याचं समोर आलंय. काही दिवसांपूर्वी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी 7 जणांना वेगवेगळ्या कारवाईत अटक केली आहे. यापैकी दोन जण काश्मीर येथून हशीस आणायचे आणि मुंबईतील त्यांच्या साथीदारांना द्यायचे. यानंतर त्या हशीसची मुंबईत विक्री व्हायची (NCB will arrest Iqbal Kaskar tomorrow after some technical issues in Kashmir Mumbai drugs racket).

हशीस रॅकेटमध्ये आतापर्यंत कुणाकुणाला अटक?

पहिल्या कारवाईत एनसीबी अधिकाऱ्यांनी 7 जणांची चौकशी केली होती. ही कारवाई मुंबई आणि ठाणे भागात केली होती. यावेळी 17 किलो हशीस जप्त करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे साडेचार लाख रुपये कॅश जप्त करण्यात आली होती. या कारवाईत कमलेश गुप्ता, अमित पटेल, राजविंदर सिंग, गुरमित सिंग, नूर मोहमद, शब्बीर शेख आणि निझमुद्दीन ताजा यांना ताब्यात घेतलं होतं. यापैकी गुरमित सिंग आणि राजविंदर सिंग हे पंजाब ते मुंबई मोटार सायकलवरून प्रवास करायचे. यावेळी बॅगेतून हशीस आणायचे.

2 दिवसात 35 किलो हशीस आणि लाखो रुपयांची रोकड जप्त

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे कारवाया करून सुमारे 2 दिवसात 35 किलो हशीस जप्त केलं होतं. त्याचप्रमाणे लाखो रोख रक्कम जप्त केली होती. या तपासाचे धागेदोरे इकबाल कासकर याच्यापर्यंत पोहचले. यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी इकबाल कासकर याचा ताबा मिळवण्यासाठी हालचाल सुरू केली. कोर्टाकडून इकबाल कासकर याच्या अटकेचं वॉरंट मिळवल्यानंतर आज (23 जून) एनसीबी अधिकारी यांनी इकबालचा ताबा मिळवण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र काही तांत्रिक बाबीमुळे इकबालचा ताबा मिळाला नाही. यामुळे एनसीबी अधिकारी गुरुवारी (24 जून) इकबाल कासकर याचा ताबा घेऊन त्याला अटक करणार आहेत.

इक्बाल कासकरवर कोणता आरोप?

इक्बाल कासकरवर एनसीबीनं जम्मू काश्मीरमधून पंजाबमध्ये 25 किलो ड्रग्ज पुरवल्याचा आरोप आहे. हे ड्रग्ज मुंबईत देखील विकण्यात आलं होतं. एनसीबीनं काश्मीरमधून होणाऱ्या ड्रग्ज तस्करीचा तपास केला असता या कारवाईतून या प्रकरणात गँगस्टर दाऊद इब्राहिम याचा भाऊ इकबाल कासकर याच संबंध असल्याचं उघड झालं. आता इकबाल कासकर याच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. इकबाल कासकर याचं अटक वॉरंट कोर्टाकडून मिळवल्यानंतर त्याची चौकशी केली जाईल.

हेही वाचा :

समीर वानखेडेंची आणखी एक धडाकेबाज कामगिरी, थेट दाऊदच्या भावाला बेड्या

90 च्या दशकात अंडरवर्ल्डला भिडलेल्या निवृत्त एसीपीचा मुलगा ड्रग्ज प्रकरणात अटकेत

ड्रग्स केक बेकरी प्रकरणात आरोपीला अटक, आफ्रिकन नागरिकाला ड्रग्ज पुरवणारा रिक्षाचालकही गजाआड

व्हिडीओ पाहा :

NCB will arrest Iqbal Kaskar tomorrow after some technical issues in Kashmir Mumbai drugs racket

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.