ड्रग्स केक बेकरी प्रकरणात आरोपीला अटक, आफ्रिकन नागरिकाला ड्रग्ज पुरवणारा रिक्षाचालकही गजाआड

याआधी कारवाई केलेल्या ड्रग्ज केक बनवणाऱ्या बेकरीच्या प्रकरणात सचिन तुपे या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून LSD ड्रग्जच्या 11 ब्लॉट्स जप्त करण्यात आल्या आहेत.

ड्रग्स केक बेकरी प्रकरणात आरोपीला अटक, आफ्रिकन नागरिकाला ड्रग्ज पुरवणारा रिक्षाचालकही गजाआड
Jail
ब्रिजभान जैस्वार

| Edited By: अनिश बेंद्रे

Jun 21, 2021 | 8:07 AM

मुंबई : मुंबईतील माहिम परिसरात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने रविवारी छापेमारी केली. एनसीबीने तीन वेगवेगळ्या कारवाया करत तिघा जणांना अटक केली आहे. ड्रग्स केक बनवणाऱ्या बेकरी प्रकरणातील आरोपीसह तीन जणांना बेड्या ठोकण्यात आल्या. (NCB raids in Mahim Goregaon arrests accuse in Drugs Cake Bakery Case)

याआधी कारवाई केलेल्या ड्रग्ज केक बनवणाऱ्या बेकरीच्या प्रकरणात सचिन तुपे या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून LSD ड्रग्जच्या 11 ब्लॉट्स जप्त करण्यात आल्या आहेत.

बेकरी आणि ड्रग्ज प्रकरण काय?

एनसीबी अधिकाऱ्यांना मुंबईच्या मालाड येथील एका बेकरीतून ड्रग्जचा पुरवठा केला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारावर अधिकाऱ्यांनी कारवाई केली. अधिकाऱ्यांनी संबंधित बेकरीत थेट छापा टाकला. यावेळी एका डब्यात अधिकाऱ्यांना 160 ग्रॅम गांजा मिळाला. पोलिसांनी बेकरीतील कर्मचाऱ्यांची चौकशी केला तेव्हा सर्व प्रकार उघड झाला.

बेकरीतील तिघांना अटक

संबंधित बेकरीतून केक आणि पेस्ट्रीद्वारे हाय प्रोफाईल परिसरातील नागरिकांना ड्रग्ज पुरवठा केला जायचा. एनसीबी अधिकाऱ्यांनी बेकरीतील सर्व ड्रग्ज ताब्यात घेतलं. तसेच बेकरीतील तिघांना अटक केली.

रिक्षाचालकालाही बेड्या

दुसरीकडे, गोरेगाव परिसरात एनसीबीने कारवाई करत अफसार शेख या रिक्षाचालकाला अटक केली. तो एका आफ्रिकन नागरिकाला ड्रग्ज पुरवत असल्याची माहिती एनसीबीच्या हाती लागली होती. एनसीबी आता या आफ्रिकन ड्रग्ज सप्लायरच्या शोधात आहे.

मुंबईतील माहिम परिसरात एनसीबीने कारवाई करत 60 ग्रॅम एमडी आणि 360 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

एनसीबीची धडाकेबाज कारवाई

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात ड्रग्जचं प्रकरण समोर आल्यापासून एनसीबी सक्रिय झालं आहे. तेव्हापासून एनसीबीने आतापर्यंत अनेक ठिकाणी कारवाई केली आहे. अनेक ड्रग्ज माफियांना अटक केली आहे. तसेच बॉलिवूडमधील ड्रग्ज माफियांनाही पकडलं आहे. तसेच अनेक दिग्गज अभिनेते-अभिनेत्रींची देखील चौकशी केली आहे.

संबंधित बातम्या : 

बॉलिवूड अभिनेत्रीची वाढदिवसानिमित्त ड्रग्ज पार्टी, मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये अटक

बेकरीच्या आड ड्रग्जचा धंदा ! केक आणि पेस्ट्रीतून हाय प्रोफाईल लोकांना गांजाचा पुरवठा

(NCB raids in Mahim Goregaon arrests accuse in Drugs Cake Bakery Case)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें