चोराच्या उलट्या बोंबा, मध्यरात्री चोरटा सोसायटीत घुसला, चोरी करताना रंगेहाथ पकडलं, पण…….

विरारमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एक चोरटा एका इमारतीत चोरीच्या हेतूने शिरला. तो चोरी करताना रंगेहाथ पकडलाही गेला (thief beat members of society after he caught by them in Virar).

चोराच्या उलट्या बोंबा, मध्यरात्री चोरटा सोसायटीत घुसला, चोरी करताना रंगेहाथ पकडलं, पण.......
चोराच्या उलट्या बोंबा, मध्यरात्री चोरटा सोसायटीत घुसला, चोरी करताना रंगेहाथ पकडलं

विरार (पालघर) : विरारमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एक चोरटा एका इमारतीत चोरीच्या हेतूने शिरला. तो चोरी करताना रंगेहाथ पकडलाही गेला. पण पकडल्यानंतर त्याने निमूटपणे स्वत:ला सोसायटीतील नागरिकांच्या स्वाधीन न होता त्यांना प्रतिकार केला. चोराने सोसायटीतील नागरिकांनाच बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सोसायटीतील इतर नागरिकांच्या मदतीने त्याला पकडण्यात आलं. सोसायटीतील नागरिकांनी त्याला पोलिसांच्या हातात दिलं. पण या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सोसायटीतील नागरिकांमध्ये चोरांबद्दल धास्ती निर्माण झालीय (thief beat members of society after he caught by them in Virar).

नेमकं काय घडलं?

विरारच्या देवकृपा अपार्टमेंटमधील मकवाना कॉम्प्लेक्स या इमारतीत संबंधित प्रकार घडला. संबंधित प्रकार रात्री उशिरा एक ते दोन वाजेच्या सुमारास घडला. एक चोरटा बिल्डिंगमध्ये घुसला आणि चोरी करू लागला. तेवढ्यात बिल्डींगमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी त्याला पकडलं आणि त्याची विचारपूस केली. तेथील लोक या चोरट्याला विचारत असताना चोरट्याने त्यांना मारहाण केली. नागरिकांनाी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पण चोरट्याने कबड्डी स्टाईलमध्ये दोघांवर हल्ला केला. अखेर सोसायटीतील इतर नागरिकांच्या मदतीने चोरटा पकडला गेला.

चोराजवळ दुबईचं पासपोर्ट

या चोरट्याच्या खिशातून दुबईचा पासपोर्ट मिळालं आहे. तसेच त्याच्याजवळ केरळचं ड्रायव्हिंग लायसन्स हे ओळखपत्रही सापडलं आहे. हा चोरटा दारूच्या नशेत होता. सोसायटीतील नागरिकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत (thief beat members of society after he caught by them in Virar).

हेही वाचा :

पालांडे डील करायचे, कुंदन कॅश स्वीकारायचा, देशमुखांच्या PA वर आरोप, ED पुन्हा समन्स पाठवणार

विनायक मेटेंच्या औरंगाबादेतील बैठकीत गोंधळ, एक लाखांची चेन लंपास, नऊ जणांवर गुन्हे

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI