शाही घराणे, राजवाडे, अलिशान कार आणि तरुणींचे खासगी फोटो; 50 महिलांना फसवणारा टिकटॉक स्टार जेरबंद

देवासीला जुहू पोलिसांनी गेल्या वर्षी अशाच एका प्रकरणात अटक केली होती आणि नुकतीच त्याची जामिनावर सुटका झाली होती, असंही पोलिसांनी सांगितलं.

शाही घराणे, राजवाडे, अलिशान कार आणि तरुणींचे खासगी फोटो; 50 महिलांना फसवणारा टिकटॉक स्टार जेरबंद
शाही घराणे, राजवाडे, अलिशान कार आणि तरुणींचे खासगी फोटोImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 26, 2022 | 10:18 AM

मुंबई: स्वत:ला राजस्थानच्या शाही घराण्यातील असल्याचं भासवून एक दोन नव्हे तर तब्बल 50 महिलांची फसवणूक करणाऱ्या टिकटॉक स्टारला पोलिसांनी अटक केली आहे. हा टिकटॉक स्टार आधी महिलांशी मैत्री करून त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा. नंतर त्यांच्याकडून त्यांचे खासगी फोटो मागवायचा. त्यानंतर या महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळायचा. एका महिलेने या प्रकरणी तक्रार केल्यानंतर गोरेगाव पोलिसांनी या टिकटॉक स्टारला अटक केली असून त्यानंतर हा पर्दाफाश झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

देवासी ऊर्फ राजवीर सिंग असं या टिकटॉक स्टारचं नाव आहे. तो 25 वर्षाचा असून मूळचा राजस्थानचा आहे. तो महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी अनोखी पद्धत वापरत होता. तो इन्स्टाग्रामवर राजस्थानी राजवाड्यांमधील स्वत:चे शेकडो फोटो पोस्ट करत होता. त्यानंतर तो तरुणींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायचा. राजघराण्यातील व्यक्ती म्हणून अनेत तरुणी त्याच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारायच्या.

हे सुद्धा वाचा

त्यानंतर तो या तरुणींशी मैत्री हळूहळू संवाद वाढल्यावर तुझ्या प्रेमात पडल्याचं तो तरुणींना सांगायचा. तरुणींचा होकार आल्यानंतर काही दिवस तो तरुणींसोबत प्रेमाचं नाटक करायचा. त्यानंतर या तरुणींना त्यांचे खासगी फोटो पाठवण्यास सांगायचा. या फोटोंचा तो नंतर खंडणीसाठी वापर करायचा.

तरुणी आणि महिलांनी वैयक्तिक फोटो पाठवल्यानंतर हे खासगी फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी द्यायचा. काही तरुणी आणि महिला बदनामी होऊ नये म्हणून त्याच्या धमकीला बळी पडल्याचंही पोलीस सूत्रांनी सांगितलं.

गोरेगाव येथे राहणारी एक 30 वर्षीय विवाहित महिला देवासीच्या जाळ्यात सापडली होती. तिलाही देवासीने पैसे न दिल्यास तिचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. त्यामुळे बदनामीच्या भीतीने या महिलेने त्याला चार लाखाहून अधिक रक्कम दिली. पण तो या महिलेला वारंवार पैसे मागत असल्याने अखेर या महिलेने गोरेगाव पोलिसात धाव घेतली.

महिलेच्या तक्रारीनंतर गोरेगाव पोलिसांनी देवासीला मंगळवारी रात्री आरे कॉलनीतून अटक केली. त्याच्यावर खंडणी वसूल केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच भादंविचे इतर कलमंही त्याच्यावर लावण्यात आली आहेत. तसेच आयटी कायद्याखालीही त्याला अटक केली आहे.

आरोपी हा मूळचा राजस्थानचा असून त्याचे इंस्टाग्राम अकाऊंट चकाकणारे राजवाडे, आलिशान वाहने आणि सुरक्षा रक्षकांच्या छायाचित्रांनी भरलेले आहे. त्याने आतापर्यंत 50 हून अधिक महिलांना ब्लॅकमेल केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीही टिकटॉक स्टार आहे.

आरोपी देवासी उर्फ राजवीर सिंगला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती गोरेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्री थोपटे यांनी सांगितलं.

देवासीला जुहू पोलिसांनी गेल्या वर्षी अशाच एका प्रकरणात अटक केली होती आणि नुकतीच त्याची जामिनावर सुटका झाली होती, असंही पोलिसांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.