Video : फुकटात सिगरेट न दिल्याने टपरी चालकावर हल्ला! उल्हासनगरातील घटना सीसीटीव्हीत कैद

Video : फुकटात सिगरेट न दिल्याने टपरी चालकावर हल्ला! उल्हासनगरातील घटना सीसीटीव्हीत कैद
जीवघेणा हल्ला
Image Credit source: TV9 Marathi

Ulhasnagar Crime News :एक तासापूर्वी हल्ला करणाऱ्या या व्यक्तीनं सिगरेट घेण्यासाठी टपरीवर हजेरी लावली होती. पण त्याला सिगारेट देण्यात आली नाही म्हणून तो संतापला होता.

निनाद करमरकर

| Edited By: सिद्धेश सावंत

May 21, 2022 | 7:31 AM

उल्हासनगर : टपरी चालकाच्या (attack on Pawn Shop owner) डोक्यात फोडल्या बियरच्या बाटल्या (Beer bottle) एका ग्राहकानं फोडल्या. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुकटात सिगारेट न दिल्यानं एका ग्राहकानं संतापून टपरी चालकावर जीवघेणा हल्ला केला. ही घटना उल्हासनगरच्या (Ulhasnagar Crime News) कॅम्प चारमधील संभाजी चौकात घडली. संभाजी चौकात मनीष पान शॉप नावाची पानटपरी आहे. या टपरीवर गुरुवारी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास एक तरूण फुकटात सिगरेट मागण्यासाठी आला. मात्र टपरी चालकाने त्याला फुकटात सिगरेट देण्यास नकार दिल्यानं या तरुणाच्या दुसर्‍या एका साथीदाराने तिथे येऊन टपरी चालकाच्या दिशेनं बियरच्या दोन बाटल्या फेकल्या. यातली एक बाटली टपरी चालकाने हातावर झेलली. तर दुसरी बाटली ही टपरी चालकाच्या डोक्यात जाऊन फुटली.

घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

जीवघेण्या हल्ल्यामध्ये परी चालकाच्या डोक्याला गंभीर इजा झाली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या सीसीटीव्हीच्या आधारे या तरुणांचा शोध घेतायत.

पाहा व्हिडीओ :

…आणि बाटली थेट डोक्यावर आदळली!

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या घटनेत हल्लेखोरानं दोन बिअरच्या बाटल्या टपरी चालकावर भिरकावल्याचं दिसतंय. अत्यंत वेगान काचेच्या बाटल्या दुकानावर भिरकावण्यात आल्या होत्या. यातील एका बाटलीचा वार हातानं रोखण्यात टपरी चालकाला यश आलं.

पण दुसरी बाटली वेगानं टपरी चालकाच्या दिशेने भिरकावली गेली आणि थेट डोक्यावर जाऊन आदळली. या टपरी चालक गंभीर जखमी झाला आहे.

पाहा व्हिडीओ : पोलीस भरती संदर्भात महत्त्वाची बातमी

हे सुद्धा वाचा

हल्लेखोराचा शोध सुरु

एक तासापूर्वी हल्ला करणाऱ्या या व्यक्तीनं सिगरेट घेण्यासाठी टपरीवर हजेरी लावली होती. पण त्याला सिगारेट देण्यात आली नाही म्हणून तो संतापला होता. दरम्यान, एका तपासानं परत येऊन त्यानं थेट दुकानावर हल्ला केला आणि पळ काढला, असं टपरी चालकानं म्हटलंय. हल्ला करणारा तरुण नशेबाज असल्याचा आरोप टपरी चालकाने केलाय. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें