VIDEO : जुन्या वादाचा राग, व्यापारी-कर्मचाऱ्याला लोखंडी रॉडने मारहाण, सीसीटीव्हीत थरार कैद, एका आरोपीला काही तासातच बेड्या

उल्हासनगर एका शुजच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार काल (7 ऑगस्ट) रात्री घडला आहे.

VIDEO : जुन्या वादाचा राग, व्यापारी-कर्मचाऱ्याला लोखंडी रॉडने मारहाण, सीसीटीव्हीत थरार कैद, एका आरोपीला काही तासातच बेड्या
उल्हासनगरमध्ये व्यापारी-कर्मचाऱ्याला गुंडांची मारहाण

उल्हासनगर (ठाणे) : उल्हासनगर एका शुजच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार काल (7 ऑगस्ट) रात्री घडला आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत काही तासातच एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून ही मारहाण केल्याचा आरोप आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

उल्हासनगरच्या कॅम्प 1 भागात राहुल शूज नावाचं दुकान आहे. या दुकानाचे मालक सुरेश छाब्रिया आणि मुख्य आरोपी अशोक वानखेडे यांचे तीन दिवसांपूर्वी वाद झाले होते. या वादात वानखेडे याला मारहाण झाली होती. त्यामुळे वानखेडे याने त्याच्या अन्य काही साथीदारांना सोबत घेत काल राहुल शूज दुकानाबाहेर येऊन दुकानातील कामगार दीपक छाब्रिया याला लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. दुकानाचे मालक आणि अन्य कामगार त्याला सोडवायला मध्ये गेले असता त्यांनाही किरकोळ मारहाण करण्यात आली.

शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास संबंधित घटना घडली. दीपक छाब्रिया राहुल शूज दुकानाबाहेर उभा असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला. त्याला लोखंडी रॉड आणि लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आली. तसेच हे भांडण सोडवण्यासाठी गेलेले राहुल शूज दुकानाच्या मालकालाही गुंडांनी मारहाण करत दुकानाबाहेर तोडफोड केली. ही सर्व घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे.

एका आरोपीला बेड्या

या हाणामारीत जखमी झालेल्या दीपक गोपलानी आणि दुकानाचा कर्मचारी दीपक छाब्रिया यांना उल्हासनगरमधील ममता नर्सिंग होम या रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यात दीपक छाब्रिया हे गंभीर जखमी झाले आहेत. हल्ला करुन चारही हल्लेखोर पळून गेले होते. यापैकी एका आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे. या घटनेनंतर उल्हासनगरमधील व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. व्यापारी संघटना सतत गुंडांकडून व्यापाऱ्यांना होणाऱ्या मारहाणीचा संताप व्यक्त करत आहेत.

पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं?

या मारहाणीत दीपक छाब्रिया याचा एक पाय फ्रॅक्चर झाला आहे. मारहाणीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा भादंवि 326 नुसार गुन्हा दाखल करत तपासाची चक्र फिरवली आणि काही तासातच अक्षय पिल्ले या एका आरोपीला बेड्या ठोकल्या. तर मुख्य आरोपी अशोक वानखेडे आणि अन्य 2 असे तीन आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असून लवकरच त्यांनाही अटक केली जाईल, अशी माहिती उल्हासनगरचे साहाय्यक पोलीस आयुक्त धुळा टेळे यांनी दिली आहे.

हेही वाचा :

जेवणानंतर घराबाहेर पडला आणि ट्रेनसमोर उडी मारली, गोंदियात तरुणाच्या आत्महत्येचा थरार

पतीशी विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय, पत्नीने बळजबरी तरुणीचे केस कापले

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI