जेवणानंतर घराबाहेर पडला आणि ट्रेनसमोर उडी मारली, गोंदियात तरुणाच्या आत्महत्येचा थरार

गोंदिया जिल्ह्याच्या नवेगांव बांध येथे गोंदिया-बल्लरशहा रेल्वेमार्गावर ही घटना घडवी. 34 वर्षीय हितेश वालदे याने धावत्या मालगाडीच्या समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली.

जेवणानंतर घराबाहेर पडला आणि ट्रेनसमोर उडी मारली, गोंदियात तरुणाच्या आत्महत्येचा थरार
क्लॉक रूमची सुविधा- ज्या लोकांकडे ट्रेनची तिकिटे आहेत, ते स्टेशनवरील क्लॉक रूम वापरू शकतात आणि त्यांचे सामान जमा करू शकतात.
शाहिद पठाण

| Edited By: अनिश बेंद्रे

Aug 08, 2021 | 12:21 PM

गोंदिया : धावत्या ट्रेनसमोर उडी घेत युवकाने आत्महत्या केल्याची घटना गोंदियात उघडकीस आली आहे. जेवणानंतर खर्रा खाण्याच्या निमित्ताने तो बाहेर पडला होता. हितेश वालदे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

गोंदिया जिल्ह्याच्या नवेगांव बांध येथे गोंदिया-बल्लरशहा रेल्वेमार्गावर ही घटना घडवी. 34 वर्षीय हितेश वालदे याने धावत्या मालगाडीच्या समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. हितेशच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

नेमकं काय घडलं?

हितेश रात्रीचं जेवण करुन खर्रा घेण्यासाठी जातो, असं सांगून घराबाहेर पडला होता. मालगाडीच्या समोर येऊन त्याने आपलं आयुष्य संपवलं. या घटनेचे माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली. त्यानंतर घटनास्थळी एकच गर्दी जमा झाली होती. या घटनेची माहिती लोहमार्ग पोलिसासह नवेगांव बांध पोलिसांनी दिली. हितेशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

धावत्या ट्रेनमध्ये प्रेयसीची हत्या

दुसरीकडे, इंदौर-बिलासपूर नर्मदा एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या 21 वर्षीय युवतीची हत्या झाल्याची घटना काही महिन्यांपूर्वीच उघडकीस आली होती. इंदौरमध्ये राहणाऱ्या मुस्कान हाडा हिची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. धावत्या ट्रेनमध्ये चाकूने भोसकून तिची हत्या केल्यानंतर आरोपी प्रियकर पसार झाला होता.

आरोपी सागर सोनी मुस्कानवर प्रेम करत होता. मात्र तिने त्याला सोशल मीडियावर ब्लॉक केलं होतं. त्यामुळे दोघांमध्ये कुठलीही बातचित होऊ शकत नव्हती. त्याच रागातून सागरने मुस्कानची ट्रेनमध्ये हत्या केली होती.

संबंधित बातम्या :

साताऱ्यातील पैलवानांसह नाशिकच्या तरुणाचा केरळातील बँकेवर दरोडा, साडेसात किलो सोन्याची लूट

लॉजवर बोलवून प्रेयसीची गळा दाबून हत्या, नाशिकमध्ये प्रियकराला बेड्या

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें