मस्करीची कुस्करी, दोघांच्या भांडणात निष्पाप तरुणाची हत्या, टिटवाळ्यातील धक्कादायक घटना

मित्रांमधील मस्करी एका निष्पापाच्या जीवावर बेतली आहे. दोन मित्रांमध्ये मस्करी सुरु होती. या मस्करीचे रुपांतर कडाक्याच्या भांडणात झालं. या दोन्ही मित्रांमधील भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या तरुणाची हत्या करण्यात आली आहे.

मस्करीची कुस्करी, दोघांच्या भांडणात निष्पाप तरुणाची हत्या, टिटवाळ्यातील धक्कादायक घटना
मस्करीची कुस्करी, दोघांच्या भांडणात निष्पाप तरुणाची हत्या, टिटवाळ्यातील धक्कादायक घटना

टिटवाळा (ठाणे) : मित्रांमधील मस्करी एका निष्पापाच्या जीवावर बेतली आहे. दोन मित्रांमध्ये मस्करी सुरु होती. या मस्करीचे रुपांतर कडाक्याच्या भांडणात झालं. दोन्ही मित्र एकमेकांचे शत्रू असल्यासारखं एकमेकांना शिवीगाळ करु लागले. यावेळी त्यांचे भांडण सोडविण्यासाठी आलेला निष्पाप तरुण अनिल दुधाडे याची हत्या करण्यात आली. गैरसमजूतीने हा प्रकार घडल्याने टिटवाळ्यात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

म्हारळ परिसरात राहणारे दिनेश सुरडकर आणि संदीप डांबले यांच्यात काही गोष्टीवरुन मस्करी सुरु होती. या मस्करी दरम्यान दिनेश याने संदीपला शिवीगाळ केली. या कारणावरुन दोघांमध्ये वाद सुरु झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. संदीप आणि दिनेश यांचा वाद सुरु असताना अनिल तिथे आला. त्याने या दोघांचे भांडण सोडविण्यास सुरुवात केली. याचवेळी आरोपी संदीप याचा लहान भाऊ दिपक त्याठिकाणी आला. त्याला असे वाटले की, अनिल हा संदीपला मारतोय. यावेळी दीपकने धारदार शस्त्राने अनिलच्या पोटात वार केले. जखमी अनिल याचा नंतर मृत्यू झाला.

आरोपींना बेड्या

या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी आरोपींना चार तासाच्या आत अटक केली आहे. आरोपी हे दोघे सख्ये भाऊ आहेत. आरोपी संदीप आणि दीपक या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. मस्करीने सुरु झालेले भांडण आणि त्यातून एका निष्पापाची झालेली हत्या यामुळे टिटवाळा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

चंद्रपुरात मित्राची हत्या

दुसरीकडे चंद्रपूर शहरात दोन मित्रांनी मिळून तिसऱ्या एका मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी पूर्ववैमनस्यातून ही हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. विशेष म्हणजे हत्या करण्याआधी आरोपींनी मृतकाला प्रचंड दारु पाजली. त्यानंतर त्यांनी आधीचा भांडणाचा विषय काढत वाद घातला. वाद चिघडल्यानंतर आरोपींनी मित्रावर चाकूने वार करत हत्या केली. पोलीस या प्रकरणी आणखी तपास करत आहेत.

आरोपींनीच पोलिसांना फोन करुन हत्येची माहिती दिली

चंद्रपूर शहरातील म्हाडा कॉलनीच्या निर्जन भागात युवकाची हत्या झाल्याची घटना आज (11 सप्टेंबर) उजेडात आली आहे. तिरवंजा गावी राहणाऱ्या संकेत सुमटकर याची 2 मित्रांनी जुन्या वादातून हत्या केल्याचे तपासात उघड झालंय. शुभम साखरकर आणि संगम सागोरे या दोघांनी ही हत्या केल्याचे प्राथमिक पोलीस तपासात उघड झालं आहे. विशेष म्हणजे आरोपींनी स्वतः पोलिसांना फोन करुन या हत्येची माहिती दिली.

नाशिकमध्येही हत्येची घटना

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये देखील एका हॉटेलात आचारीचं काम करणाऱ्या व्यक्ती हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. विशेष म्हणजे या हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली होती. तरुण आरोपीने आपल्यापेक्षा वयाने मोठ्या, वडिलांच्या वयाच्या व्यक्तीला मारहाण करत त्यांच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. संबंधित घटना ही मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास घडली आहे. ही संबंध घटना सीसीटीव्हीत अचूकपणे कैद झाली आहे. विशेष म्हणजे मध्यरात्री पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना रामसेतू पूल परिसरात संबंधित मृतदेह आढळला. त्यानंतर संबंध प्रकार उघडकीस आला.

हेही वाचा :

हा चित्रपट नाही, ही खरी हत्या, नाशिकमध्ये मध्यरात्री रस्त्यावर हत्येचा थरार, सीसीटीव्हीत घटना कैद

नाशिकमध्ये फक्त वीस रुपयांसाठी कटरने गळा चिरला, अर्ध्या किमीपर्यंत रक्ताचे डाग

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI