भेटण्याच्या बहाण्याने बोलावून बलात्कार, मुंबईत घटस्फोटित पतीविरोधात महिलेची तक्रार

तक्रारदार महिला आणि आरोपीचा घटस्फोट झाला आहे. त्यानंतरही दोघांमध्ये बोलणं सुरु होतं. (Mumbai Man raped divorced wife )

भेटण्याच्या बहाण्याने बोलावून बलात्कार, मुंबईत घटस्फोटित पतीविरोधात महिलेची तक्रार
घटस्फोटित पत्नीवर तरुणाचा बलात्कार
Follow us
| Updated on: Mar 27, 2021 | 1:06 PM

मुंबई : घटस्फोटित पतीने आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार मुंबईतील महिलेने केली आहे. भेटण्याच्या बहाण्याने बोलावून जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप महिलेने केला आहे. (Mumbai Man allegedly raped divorced wife in Kandivali)

महिलेच्या तक्रारीवरुन कांदिवली पोलिसांनी घटस्फोटित पतीविरोधात कलम 376 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार तक्रारदार महिला आणि आरोपीचा घटस्फोट झाला आहे. त्यानंतरही दोघांमध्ये बोलणं सुरु होतं.

भेटण्याच्या बहाण्याने बोलावून बलात्कार

आरोपी घटस्फोटित पतीने महिलेला भेटण्यासाठी बोलावलं. त्यानंतर त्याने आपल्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले, अशी तक्रार महिलेने केली आहे. त्यानंतर पोलिसांनी घटस्फोटित पतीविरोधात गुन्हा दाखल केला.

नवी मुंबईत बापलेकीच्या नात्याला काळीमा

बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना नवी मुंबईच्या उलवे येथे काही दिवसांपूर्वी घडली होती. नराधम बापाने आपल्या पोटच्याच अवघ्या तेरा वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी एनआरआय पोलिसांनी आरोपी बापाला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीला कोर्टाने 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. संबंधित आरोपीचं नाव अरुण हंकारे असल्याची माहिती समोर आली आहे. (Mumbai Man allegedly raped divorced wife in Kandivali)

लग्नाच्या आमिषाने बलात्कार

मुंबईतील सार्वजनिक बांधकाम अभियंत्याविरोधात बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिला पोलिसाने आत्महत्या केल्याची घटना गेल्या महिन्यात उघडकीस आली होती. 47 वर्षीय महिला पोलीस हवालदाराने पिंपरी चिंचवडमध्ये आयुष्य संपवलं होतं. धक्कादायक म्हणजे तक्रारदार महिलेच्या पतीनेही चार वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती.

सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता असलेल्या आरोपीने लग्नाच्या आमिषाने आपल्यावर वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केला. त्यानंतर लग्नास नकार दिला, असा दावा तक्रारदार महिलेने वरळी पोलिसात केलेल्या तक्रारीत केला होता. संबंधित पहिला पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात कार्यरत होती. तिचा पतीही पोलीस हवालदार होता. त्याने चार वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती.

संबंधित बातम्या :

मुंबईतील अभियंत्यावर बलात्काराचा आरोप, 47 वर्षीय महिला पोलिसाची पुण्यात आत्महत्या

कारागृहात सात कर्मचारी आणि दोघा गुन्हेगारांकडून लैंगिक अत्याचार, नागपुरात तृतीयपंथी कैद्याची तक्रार

(Mumbai Man allegedly raped divorced wife in Kandivali)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.