AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बँकेच्या केवायसीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक, मुंबई पोलिसांनी फिल्मी स्टाईलने आवळल्या मुसक्या

कैवायसीच्या नावाखाली नागरिकांना गंडा घालायचा. झारखंडमध्ये बसून मुंबईतील नागरिकांची फसवणूक करायचा. पण मुंबई पोलिसांनी गुन्हेगाराला हेरलेच.

बँकेच्या केवायसीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक, मुंबई पोलिसांनी फिल्मी स्टाईलने आवळल्या मुसक्या
मुंबईतील नागरिकाला फसवणाऱ्या ठगाला झारखंडमधून अटकImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 07, 2023 | 9:58 AM
Share

मुंबई : बँकेची केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक करणाऱ्या ठगाला बोरीवली पोलिसांनी अखेर झारखंडमधून जेरबंद केले आहे. हुसेन अजगर अली अन्सारी असे अटक आरोपीचे नाव आहे. बोरिवली येथील रहिवासी असलेल्या तक्रारदाराने 8 फेब्रुवारी रोजी बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. बँकेचे केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली त्यांच्या खात्यातून 2 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. त्यानंतर बोरिवली पोलिसांनी सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला. तांत्रिक तपास आणि सूत्रांच्या मदतीने आरोपी झारखंडमध्ये असल्याचे निष्पन्न झाले.

फिल्मी स्टाईलने पाठलाग करुन आरोपीला अटक

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बोरिवली पोलिसांनी एक पथक तयार केले. पोलीस उपनिरीक्षक कल्याण पाटील यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने गाव बरडदुब्बा तहसील पालाजोरी जिल्हा देवघर झारखंड येथे छापा टाकला. आरोपी हुसेन अजगर अली अन्सारी हा 14 मोबाईल घेऊन बसला होता. पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी पळून जाऊ लागला. मात्र पोलीस उपनिरीक्षक कल्याण पाटील यांनी आरोपी हुसेनला फिल्मी स्टाईलमध्ये अर्धा किलोमीटर पाठलाग करुन अटक केली.

बोरिवली पोलिसांकडून आरोपीची अधिक चौकशी सुरु

आरोपीकडून 14 मोबाईल आणि अनेक सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. तक्रारदाराच्या खात्यातून आरोपींनी ट्रान्सफर केलेल्या 2 लाख रुपयांपैकी 1 लाख रुपये आयसीआयसीआय बँकेच्या कोलकाता शाखेत गोठवण्यात आले आहेत. या फसवणुकीत आणखी किती जणांचा सहभाग आहे आणि त्यांनी आतापर्यंत किती लोकांची फसवणूक केली आहे, याबाबत बोरीवली पोलीस आरोपींकडे चौकशी करत आहेत.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.