Mumbai Crime : चार महिन्यांत 4 कोटींचा फ्रॉड, OTP न घेताच कसे लुटले पैसे ?

मुंबईत राहणाऱ्या एका वृद्ध दांपत्याला महिलेने चुना लावला आहे. त्यांची फसवणूक करत तिने ४ कोटी रुपये लुटले. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.

Mumbai Crime : चार महिन्यांत 4 कोटींचा फ्रॉड, OTP न घेताच कसे लुटले पैसे ?
Follow us
| Updated on: Oct 26, 2023 | 2:19 PM

मुंबई | 26 ऑक्टोबर 2023 : मुंबईत राहणाऱ्या एका ७० वर्षांच्या वृद्ध दांपत्याची कोट्यवधींची फसवणूक (fraud) झाली आहे. आरोपी महिला त्यांना चार महिने फसवत होती आणि तिने त्यांच्याकडून पैसे उकळले. याप्रकरणी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरंतर हे वृद्ध दांपत्य एका कॉर्पोरेट कंपनीत काम करायचं. एक दिवस त्यांना एका महिलेचा फोन आला. आपण कर्मचारी भविष्य निधि संघटनेतून (EPFO) बोलत असल्याचं तिने सांगितलं.

त्यांचा विश्वास बसावा म्हणून, तिने त्यांना ते कोणत्या कंपनीत काम करायचे, त्यांचा पॅन नंबर काय आहे, त्यांचे बँक अकाऊंट आणि रिटायरमेंट डिटेल्स बद्दल सर्व माहिती तिने दिली. आपण पीएफ डिपोर्टमेंटमधूनच बोलत असल्याचे त्या दांपत्याला पटवण्यात ती यशस्वी ठरली. त्यांनी तिला पैसे पाठवावेत यासाठीही तिने त्या दांपत्याला तयार केलं.

सुमारे ४ महिने ते दांपत्य तिला पैसे पाठवत होते, अखेर त्यांचे पैसे संपल्यावर त्या महिलेने त्यांना सांगितलं की आता त्यांचे पैसे फ्रीज झाले आहेत. आता इनकम टॅक्स विभागाचे अधिकारी त्यांना भेटण्यासाठी येतील, असे ती म्हणाली. तेव्हाच आपली फसवणूक झाल्याचे त्या दांपत्याच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली.

एक कॉल आणि लुटले ४ कोटी रुपये

मुंबईत राहणाऱ्या दांपत्याला एका महिलेचा कॉल आला आणि तिने त्यांना जाळ्यात ओढून बँक खात्यातून बरेच पैसे ट्रान्स्फर करायला लावले. गोड बोलून आणि त्यांची सर्व माहिती देऊन तिने त्यांचा विश्वास संपादन केला. आपण पीएफ डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचाही दावा तिने केला.

त्यानंतर आरोपी महिलेने त्या दांपत्याला सांगितलं की त्यांच्या कंपनीने भविष्य निधित गुंतवणुकीसाठी ४ लाख रुपये ठेवले होते, २० वर्षांनंतर ते मॅच्युअर होऊन ती रक्कम आता ११ कोटी रुपये झाली आहे. आता तुम्ही हे पैसे काढू शकता, असे तिने त्यांना सांगितले. त्यानंतर आरोपी महिलेने टीडीएस, जीएसटी आणि इनकम टॅक्सच्या नावाखाली त्या दांपत्याला पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले, त्याप्रमाणे त्यांनी ते पैसे पाठवलेही. मात्र त्यानंतरही बारच काळ ती महिला विविध कारणांसाठी त्यांच्याकडून पैसे मागत राहिली. अखेर त्यांच्याकडचे पैसे संपले आणि बँक अकाऊंट रिकामं झालं. त्यांनी त्या महिलेला पैसे संपल्याबद्दल सांगितलं असता, तिने आता तुमच्याकडे इनकम टॅक्सचे अधिकारी येतील. आपली फसवणूक झाल्याचे त्या दांपत्याच्या लक्षात आले आणि त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.