AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : मुलासोबत बाईकवर बसून ‘ते’ कामावर निघाले होते, भरधाव वेगाने कार आली अन् …

नाईट शिफ्टसाठी बाईकने कामाला जाणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानाचा अपघाता झाला आहे. कारने दिलेल्या धडकेनंतर ते खाली कोसळले व गंभीर दुखापत झाली.

Mumbai Crime : मुलासोबत बाईकवर बसून 'ते' कामावर निघाले होते, भरधाव वेगाने कार आली अन् ...
| Updated on: Sep 16, 2023 | 11:12 AM
Share

मुंबई | 16 सप्टेंबर 2023 : मुंबईतील गुन्ह्यांच्या घटना वाढत असून रस्त्यावर वाट्टेल तशा गाड्या चालवणाऱ्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून चालण्याची वेळ आली आहे. मुंबईत एक दुर्घटना घडली असून त्यामध्ये एक 55 वर्षीय नागरिक जखमी झाले आहेत. त्यांच्या बाईकला कारने जोरात धडक (car hit bike) दिल्याने ते खाली कोसळले आणि गंभीर जखमी (fireman injured in accident) झाले. गुरूवारी रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत त्या व्यक्तीसह त्यांचा मुलगाही जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमी इसम हे मरोळ फायर ब्रिगेड स्टेशनमध्ये अग्निशमन दलाचे अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संदीप ठाकूर असे जखमी इसमाचे नाव असून ते गुरूवारी रात्री त्यांचा मुलगा साहिल याच्यामागे बाईकवर बसून जात होते. साहिल त्यांना नाईट शिफ्टसाठी ऑफीसला सोडायला जात असताना 11:45 च्या सुमारास ते घाटकोपर- अंधेरी लिंक रोडवर पोहोचले. तेवढ्यात समोर एक स्पीड बंपर आल्याने साहिलने बाईकचा वेग कमी केला, तसा सिग्नलही त्याने मागच्या चालकांसाठी दिला होता. मात्र मागून एक कार वेगात येत होती, त्या कारची साहिलच्या बाईकला धडक बसली. ही धडक एवढी जोरदार होती ती मागे बसलेले संदीप हे हवेत काही फूट वर उसळले आणि धाडकन खाली कोसळले. तर त्यांचा मुलगा साहिल हा देखील बाईकसह अनेक फूट घसरत पुढे गेला.

  इतरांच्या मदतीने रुग्णालयात गेले दाखल

या अपघातानंतर आजूबाजूला जाणारे नागरिक, तसेच ज्याच्या कारमुळे धडक बसली तो चालक ( परवेज शेख, वय 22) आणि ठाकूर यांचा मुलगा साहिल यांनी संदीप ठाकूर यांना उठवले आणि उपचारांसाठी घाटकोपरमधील दिशा हॉस्पीटलमध्ये दाखल केले. या अपघातात ठाकूर यांचं डोकं, पाठ, खांदा आणि पायांना दुखापत झाली आहे.

ठाकूर यांची पत्नी शिवानी यांच्या सांगण्यानुसार, रुग्णालयात डॉक्टरांनी संदीप यांच्यावर प्राथमिक उपचार केले, परंतु शुक्रवारी संध्याकाळपर्यंत ते प्रतिसाद देत नव्हते. डॉक्टरांनी काही सॅम्पल्स घेतली तसेच एक-रे आणि सीटस्कॅनही केले. शुक्रवारी आलेल्या रिपोर्ट्सनुसार, ठाकूर यांच्या पाठीच्या कण्याला एक क्रॅक गेला असून, ते पूर्णपण बरे होण्यास बराच कालावधी लागू शकतो, असे शिवानी यांनी सांगितले. सध्या ते स्वत:चे स्वत: उठू शकत नाहीत, चालणं तर दूरच राहिलं. ठाकूर हे कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य असून, त्यांच्या आजारपणानंतर आता घरखर्च कसा चालवायचा याची विवंचना सध्या शिवानी यांना सतावत आहे.

या दुर्घटनेत ठाकूर यांचा मुलगा, साहिल याने हेल्मेट घातलेलं असल्याने त्याला किरकोळ दुखापत झाली. सध्या त्यांच्याकडे उपचारांसाठी पुरेसे पैसे नसल्याने चिंता सतावत आहे. शिवानी यांच्या सांगण्यानुसार, त्यांनी या अपघातास जबाबदार असलेल्या शेख याच्याकडे नुकसान भरपाई मागितली पण त्याने थेट नकार दिला. आता हॉस्पिटलचे पैसे भरूनन घरखर्च कसा भागवायचा हा प्रश्न शिवानी यांच्यापुढे आहे.

दरम्यान ज्याच्यामुळे अपघात झाला त्या शेखला घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.