मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; हॉटेलच्या किचनमध्ये लपवलेला रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा हस्तगत

गुन्हे शाखेच्या युनिट 12 ने गोरेगावात कारवाई करून रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा हस्तगत केला. | Remdesivir injections

मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; हॉटेलच्या किचनमध्ये लपवलेला रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा हस्तगत
REMDESIVIR
Follow us
| Updated on: Apr 27, 2021 | 9:37 AM

मुंबई: कोरोनाच्या उपचारात महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार अद्यापही सुरुच आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला 25 हजार रेमडेसिविर इंजेक्शन्स (Remdesivir injections) देण्याची घोषणा केली असली तरी हा साठा मिळण्यासाठी आणखी काही कालावधी जावा लागेल. त्यामुळे अजूनही अनेक ठिकाणी रेमडेसिविर इंजेक्शनसाठी रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळले जात आहेत. (Remdesivir injections black marketing in Mumbai)

सुजय विखे पाटलांची गुपचूप मोहीम, दिल्लीवरुन विशेष विमानाने इंजेक्शनचा मोठा साठा नगरमध्ये

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अशाच एका रॅकेटचा पर्दाफाश केला. गुन्हे शाखेच्या युनिट 12 ने गोरेगावात कारवाई करून रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा हस्तगत केला. गोरेगाव पश्चिमेला असणाऱ्या मोतीलाल नगर परिसरात लिंक रोडनजीक एका हॉटेलच्या किचनमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन्स दडवून ठेवण्यात आली होती. ही इंजेक्शन्स 20 ते 25 हजार रुग्णांच्या नातेवाईकांना रुपयांना विकली जात होती. पोलिसांनी धाड टाकली तेव्हा हॉटेलच्या किचनमध्ये 34 रेमडेसिविर इंजेक्शन्स मिळाली. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. गुजरातमधून रेमडेसिविर इंजेक्शन्स आणून ही टोळी मुंबईत ती चढ्या भावाने विकत होती.

दिल्लीवरुन रेमडेसिविर इंजेक्शन्स आणणे सुजय विखे-पाटलांना महागात पडणार?

भाजपचे खासदार डॉ सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण दिल्लीवरुन रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणल्याप्रकरणी सुजय विखे पाटील यांच्याविरोधात औरंगाबाद हायकोर्टात (Aurangabad High court) याचिका दाखल करण्यात आली आहे. अरुण कडू आणि इतर तीन जणांनी ही याचिका दाखल केली.

खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी अहमदनगरमध्ये रेमडिसव्हीर इंजेक्शनचं वाटप केले होते. हे वाटप बेकायदेशीर आहे. वाटण्यात आलेली इंजेक्शन खरी होती की बोगस होती याबाबत काहीच माहीत नाही. हे वाटप बेकायदेशीर झालं आहे. त्यामुळे याबाबत तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

संबंधित बातम्या:

सुजय विखेंना गनिमी कावा भोवण्याची चिन्हं, दिल्लीवरुन आणलेल्या इंजेक्शनप्रकरणी हायकोर्ट आक्रमक

आनंदाची बातमी! राज्यातील कोरोनाची लाट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ओसरणार; टास्क फोर्सचा अंदाज

Corona Vaccine | मुंबईत 18 वर्षांवरील व्यक्तींचे कोरोना लसीकरण लांबणीवर?

(Remdesivir injections black marketing in Mumbai)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.