AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Vaccine | मुंबईत 18 वर्षांवरील व्यक्तींचे कोरोना लसीकरण लांबणीवर?

1 मेपासून लगेच 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाल्यास कोरोना लसींचा साठा कमी पडू शकतो. | Covid vaccination

Corona Vaccine | मुंबईत 18 वर्षांवरील व्यक्तींचे कोरोना लसीकरण लांबणीवर?
BMC Corona Vaccine
| Updated on: Apr 27, 2021 | 8:49 AM
Share

मुंबई: कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने 18 ते 45 वयोगटातील सर्व नागरिकांना लसीकरणात (Covid vaccination) सहभागी करून घेण्यास हिरवा कंदील दाखवला होता. येत्या 1 मेपासून या वयोगटासाठी लसीकरण सुरु होणार आहे. त्यासाठी 28 एप्रिलपासून ऑनलाईन नोंदणीही सुरु होईल. अशावेळी आता मुंबईत इतक्यात 18 वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्यात येणार नसल्याची माहिती समोर येत आहे. (BMC says it’s not possible to start vaccination to 18 above peoples immediately)

मुंबईत कोरोना लसींचा मर्यादित साठा उपलब्ध आहे. त्यामुळे 18 वर्षांवरील तरुणांना इतक्यात कोरोना लस देता येणार नाही, अशी भूमिका मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी घेतली आहे. आयुक्त यासंदर्भात राज्य सरकारला पत्रही लिहणार असल्याचे समजते.

1 मेपासून लगेच 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाल्यास कोरोना लसींचा साठा कमी पडू शकतो. तसेच त्यामुळे लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी होऊन कोरोना प्रादुर्भाव पुन्हा वाढू शकतो, असे इकबाल सिंह चहल यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काय निर्णय देणार, हे पाहावे लागेल.

राज्यातील कोरोनाची लाट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ओसरणार

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्णपणे ओसरेल, असे महत्त्वपूर्ण भाकीत टास्क फोर्समधील डॉक्टरांनी वर्तविले आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राज्यभरात कोरोना रुग्णांची (Coronavirus in Maharashtra) संख्या झपाट्याने वाढायला सुरुवात झाली होती. मात्र, या लाटेने उच्चांक गाठला असून आता रुग्णांची संख्या स्थिर होताना दिसत आहे. त्यामुळे 31 एप्रिलपासून राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरायला सुरुवात होईल. त्यानंतर आठवडाभराच्या कालावधीत नव्या रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर दोन्हीही कमी होतील, असा टास्क फोर्समधील डॉक्टरांचा अंदाज आहे.

देशातील चार बिगरभाजप राज्यांचा 18 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास नकार

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोव्हिड लस (Covid vaccine) देण्याची परवानगी दिली आहे. मात्र, आता देशातील चार बिगरभाजप राज्यांनी या निर्णयाशी असहमती दर्शविली आहे. आमच्याकडे कोरोना लसींचा तुटवडा आहे. त्यामुळे आम्ही 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्याची मोहीम सुरु करु शकत नाही, असे या राज्यांनी केंद्राला कळवले आहे.

या चार राज्यांमध्ये पंजाब, राजस्थान, छत्तीसगढ आणि झारखंडचा समावेश आहे. 1 मेपासून 18 ते 45 या नव्या वयोगटासाठी लसीकरण सुरु होणार असल्याने बहुतांश राज्यांनी युद्धपातळीवर तयारी सुरु केली आहे. या लसीकरणासाठी 28 एप्रिलपासून नोंदणीला सुरुवात होईल. मात्र, चार बिगरभाजप राज्यांनी असमर्थता दर्शविल्याने मोदी सरकारच्या देशव्यापी मोहिमेत अडथळे येण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या:

कोरोना लसीची किंमत कमी करा; केंद्र सरकारकडून सिरम आणि भारत बायोटेकला निर्देश

Coronavirus: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; डबलिंग रेटचा कालावधी ‘इतक्या’ दिवसांनी वाढला

IPL 2021 : मैदान सोडून काय पळता, भारतात तुम्ही सुरक्षित; IPL सोडून जाणाऱ्या खेळाडूंवर कुल्टर नाईल भडकला!

(BMC says it’s not possible to start vaccination to 18 above peoples immediately)

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.