भररात्री शेतकऱ्याचा खून, आरोपीच्या मुसक्या आवळण्याचे पोलिसांसमोर आव्हान

prajwal dhage

|

Updated on: Dec 06, 2020 | 5:34 PM

डोक्यात लोखंडी रॉड घालून 65 वर्षीय शेतकऱ्याचा खून केल्याची धक्कादायक घटना हिंगोली जिल्ह्यात घडली. (murder of farmer Hingoli)

भररात्री शेतकऱ्याचा खून, आरोपीच्या मुसक्या आवळण्याचे पोलिसांसमोर आव्हान
Follow us

हिंगोली : डोक्यात लोखंडी रॉड घालून 65 वर्षीय शेतकऱ्याचा  खून झाल्याची (murder of Farmer) धक्कादायक घटना 5 डिसेंबर रोजी घडली. जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील झरा येथे भररात्री हा प्रकार घडला. मृत शेतकऱ्याचं नाव सोनाजी तडस असं आहे. शेतातील सामान चोरी करण्याच्या उद्देशातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. (murder of 65 year old farmer in Hingoli)

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील झरा येथे शेतकरी सोनाजी तडस यांच्या शेतात टीनच्या पत्रांचं बांधकाम सुरु आहे. त्यासाठी त्यांनी शेतात लोखंडी रॉड तसेच इतर सामान आणून ठेवले होते. हे सामान चोरीला जाऊ नये म्हणून राखणदारी करण्यासाठी सोनाजी तडस 5 डिसेंबरच्या रात्री शेतात झोपायला गेले. मात्र, सकाळ झाली तरी सोनाजी तडस घरी परत आले नाही. वडिलांना एवढा उशीर का झाला?, हे पाहण्यासाठी सोनाजी यांचा मुलगा त्यांना पाहण्यासाठी शेतात गेला. त्यानंतर या मुलाला सोनाजी तडस मृत अवस्थेत आढळले.

या घटनेमुळे झरा गावात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती होताच, शेजारच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तसेच, गावकऱ्यांनी पोलिसांना तत्काळ संपर्क करुन घटनेची माहिती दिली. दरम्यान, खून झाल्याचे समजताच पोलिसांनी घटनास्थाळी दाखल होत पंचनामा केला आहे. पोलिसांकडून प्रकरणाची कसून चौकशी सुरु आहे. तर, हा खून नेमका का झाला असावा?, तो आरोपी नेमका कोण आहे?, हे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

दरम्यान, अज्ञात व्यक्तीने सोनाजी यांचा खून करुन शेतातील काही लोखंडी सामान चोरुन नेले आहे. तसेच, विद्युतमोटारीचे स्टार्टरसुद्धा चोरीला गेल्याने हा खून चोरीच्या उद्देशाने झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या दिशेने पोलिसांनी आपला तपास सुरु केला आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे तडस कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. तसेच, गावकऱ्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे.

संबंधित बातम्या :

इचलकरंजीत एका रात्रीत पाच दुकानांवर डल्ला, पैसे, दागिन्यांसह गुटखाही लंपास

रेखा जरे हत्याकांड : प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचा जबाब, महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती

बाप नव्हे सैतान! गुप्तांगावर मेणाचे चटके, अमानुष मारहाण, सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला अटक

(murder of 65 year old farmer in Hingoli)


Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI