अंबरनाथमध्ये डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या, तर्कवितर्कांना उधाण, पोलिसांकडून चौकशीला सुरुवात

अंबरनाथमध्ये डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या, तर्कवितर्कांना उधाण, पोलिसांकडून चौकशीला सुरुवात
दापोली तिहेरी हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश

अंबरनाथमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे. अंबरनाथ पश्चिमेच्या वुलन मिल कंपाउंडमध्ये या तरुणाची हत्या करण्यात आली. पोलिसांकडून तरुणाची ओळख पटवण्यात येत आहे.

निनाद करमरकर

| Edited By: अजय देशपांडे

Jan 02, 2022 | 5:24 PM

ठाणे : अंबरनाथमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे. अंबरनाथ पश्चिमेच्या वुलन मिल कंपाउंडमध्ये या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, तपासाला सुरुवात केली आहे. या तरुणाजवळ त्याची ओळख पटेल असेही काहीही न सापड्याने तरुणाची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

तरुणाचे वय अंदाजे 25 ते 30 च्या दरम्यान

घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबरनाथ शहराच्या पश्चिम भागात डीएमसी कंपनीच्या बाजूला वूलन मिल कंपाउंडचं मोकळं मैदान आहे. या मैदानात आज सकाळच्या सुमारास स्थानिकांना एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. या तरुणाच्या डोक्यात भलामोठा दगड घालून त्याची हत्या करण्यात आली होती. या तरुणाचे वय अंदाजे  25 ते 30 च्या दरम्यान आहे. या मृत तरुणाची ओळख पटवण्याचे काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे. या तरुणाकडे त्याची ओळख पटेल असे काहीच आढळून न आल्याने, त्याची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. तरुणाची ओळख पटल्यानंतर त्या अनुषंगाने तपास करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ओळख पटवण्यासाठी स्थानिकांची मदत

दरम्यान तरुणाची भलामोठा दगड डोक्यात घालून हत्या करण्यात आली आहे. तरुणाची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली, त्यावरून त्याची हत्या एकाने नाही तर दोघा-तिघांनी मिळून केली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. सध्या तरुणाची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, त्यासाठी स्थानिकांची मदत घेण्यात येत आहे. लवकरच त्यांची ओळख समोर येईल अशी माहिती अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

Sulli Deal : ‘सुल्ली डील’ प्रकरणाची गृहमंत्र्यांकडून तात्काळ दखल, वळसे-पाटलांचे कठोर कारवाईचे आदेश

ट्रक अपघातात कामगार गंभीर जखमी; गडचांदूर -वनोजा मार्गावर संतप्त नागरिकांचे रास्तारोको आंदोलन

Pune crime| चारित्र्यावर संशय घेत 51वर्षीय पत्नी सोबत पतीनं केलं असं काही की …..

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें