Beed : बीडमध्ये गुंडांची दहशत, दिवसाढवळ्या तरूणावर धारदार शस्त्राने वार करुन हत्या

Beed : बीडमध्ये गुंडांची दहशत, दिवसाढवळ्या तरूणावर धारदार शस्त्राने वार करुन हत्या
मिठाईच्या दुकानातील उकळत्या पाण्यात पडली चिमुकली

बीडमधील शेख शाहिद हा त्या परिसरातील बसस्थानकाबाहेर असताना, अचानक तीन ते चार जण आले आणि त्यांनी युवकावर वार केले. मृत पावलेला तरुण केवळ 24 वर्षांचा होता.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Dec 14, 2021 | 9:17 PM

बीड : बीडमध्ये सध्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं पहायला मिळत आहे, कारण भरदिवसा रस्त्यात एका तरूणावर धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना सोमोर आली आहे. त्यामुळे परिसरात सध्या भितीचे वातावण आहे. या भ्याड हल्ल्यात तरूणाचा मृत्यू झाला आहे. या भ्याड हल्ल्यामागचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने बीडमध्ये खळबळ माजली आहे.

बीड बसस्थानकाबाहेरील घटना

बीडमधील शेख शाहिद हा त्या परिसरातील बसस्थानकाबाहेर असताना, अचानक तीन ते चार जण आले आणि त्यांनी युवकावर वार केले. मृत पावलेला तरुण केवळ 24 वर्षांचा होता. हल्ल्यानंतर त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.

दिवसाढवळ्या हत्येने बीड हादरले

या दिवसाढवळ्या झालेल्या हत्येने बीडमधील नागरिकांनी मोठी धास्ती घेतली आहे. कारण बीडमध्ये पुन्हा एकदा गुडांची दहशत वाढली असल्याचं दिसतंय. या प्रकरणात पोलीस तपास सुरू आहे. यात पोलिसांनी एकाला ताब्यात घेतल्याचीही माहिती आहे. मात्र हा हल्ला का झाला? हे हल्लेखोर कोण होते? मयत तरूणाशी त्यांचा काय संबंध होता? या हल्ल्यात कोण कोण सामील होते, याबाब बीड पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही, त्यामुळे हे असंख्य प्रश्न सध्या अनुत्तरीतच आहेत. मात्र या घटनेने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे एवढं मात्र नक्की.

Video : तुम्ही कधी हेल्मेट घातलेला रेडा बघितला आहे का? नसेल तर हा व्हिडिओ आवर्जून बघा

Sharad Pawar : यूपीएचा पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून पवारांच्या चेहऱ्यावर सहमती होतेय? ममता काय करणार?

school : राज्यात उद्यापासून शाळेची घंटा पुन्हा वाजणार, या विभागातल्या शाळा सुरू, वाचा सविस्तर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें