AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘स्वप्नात पत्नी माझ्या छाताडावर बसते आणि….’, ड्यूटीवर लेट पोहचण्याचे पोलिस शिपायाने दिले अजब कारण

या संपूर्ण प्रकरणाची तपासणी केली जात आहे. जर आवश्यकता वाटत असेल तर या प्रकरणात कौन्सिलींग देखील केले जाईल. जर कोणाला विभागीय मदत हवी असेल ती देखील दिली जाईल असे पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

'स्वप्नात पत्नी माझ्या छाताडावर बसते आणि....', ड्यूटीवर लेट पोहचण्याचे पोलिस शिपायाने दिले अजब कारण
| Updated on: Mar 04, 2025 | 10:34 PM
Share

अनेकदा पती-पत्नी यांच्या संसारात अनेक कारणाने वादविवाद होत असतात. काही वेळा हे वाद इतके विकोपाला जातात की त्यातून घरात अशांतता वाढते. अशाच एका प्रकरणात उत्तर प्रदेशातील मेरठ येथे एक हैराण करणारे प्रकरण घडले आहे. येथे एका पोलिस शिपायाला ड्यूटीवर उशीरा पोहचल्याने वरिष्ठांनी झापले असता त्याने आपली पत्नी स्वप्नात माझ्या छातीवर बसते आणि माझे रक्त पिण्याचा प्रयत्न करते,त्यामुळे मी रात्रीचा नीट झोपू शकत नाही असे उत्तर दिल्याने खळबळ उडाली आहे.

मेरठमधील ४४ व्या वाहिनी पीएसीच्या जवानाला ड्यूटीवर उशीरा पोहोचल्याने नोटिस पाठविण्यात आली. त्यात त्याने लिहीले की स्वप्नात पत्नी माझ्या छाताडावर बसते आणि माझं रक्त पिण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आपण रात्रभर झोपू शकत नाही असे लेखी कारण दिले असून ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रात्री झोप येत नसल्याने मी डिप्रेशनचे औषध घेत आहे. पोलिस शिपायाचे हे उत्तर चांगलेच व्हायरल होत आहे. कमाडेन्टनी या प्रकरणाच्या तपासाचे आदेश दिले आहे.

नोटिसीला पोलिस शिपायाचे अजब उत्तर

या पोलिस शिपायाने आपण डिप्रेशनचे औषधे घेत असल्याचा म्हटले आहे. माझ्या आईची तब्येत खूप खराब आहे. त्याने आता आपली जगण्याची इच्छा संपल्याचे सांगत देवाला शरण जाण्याचा मार्ग विचारला आहे. पीएसी कमाडन्ट सत्येंद्र पटेल यांनी सांगितले की या व्हायरल पत्राची चौकशी केली जात आहे. पोलिस जवानाच्या मानसिक स्थितीचा देखील तपास केला जाईल. आणि आवश्यकता वाटेल तेव्हा पोलीस खात्यांर्गत मदत देखील केली जाईल असे वरिष्ठ पोलिसांनी म्हटले आहे.

चिट्ठी सोशल मीडियावर व्हायरल

44 वी वाहिनी पीएसीचे कमांडन्ट सत्येंद्र पटेल यांनी मान्य केले की अशी चिट्ठी व्हायरल झाली आहे. त्याची चौकशी होत आहे. कोणता स्टाफ आहे त्याची काय समस्या आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु असेल जर आवश्यकता वाटत असेल तर या प्रकरणात कौन्सिलींग देखील केले जाईल. जर कोणाला विभागीय मदत हवी असेल ती देखील दिली जाईल असे पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.