Nagpur Crime : OLX वर बाईक विकणं तिला पडलं महागात, बसला हजारोंचा फटका

ऑनलाइन माध्यमातून बाईक विकणं एका तरूणीला फारच महागात पडलं. बाईक विकण्यासाठी तिने जाहिरात तर दिली पण ग्राहक येताच घडलं असं काही...

Nagpur Crime : OLX वर बाईक विकणं तिला पडलं महागात, बसला हजारोंचा फटका
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Nov 03, 2023 | 3:20 PM

सुनील ढगे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नागपूर | 3 नोव्हेंबर 2023 : आजकाल ऑनलाइनचा जमाना आहे. साखरेपासून सुईपर्यंत ते मोबाईलपासून बाईकपर्यंत सगळ्या गोष्टी ऑनलाइन अव्हेलेबल असते. त्यामुळे खरेदीचं कामही खूप सोपं होतं. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर जशी एखादी गोष्ट विकत घेता येते तशीच ती विकताही येते. घरातील एखादी जुनी झालेली पण चांगल्या अवस्थेतील वस्तू विकण्यासाठी ऑनलाइन ऑप्शन्स आहेत.

वेगवेगळ्या साईटवर घरातील सामान विकू शकतो. त्यापैकीच एक साईट म्हणजे OLX. घरातील कोणतही सामान तुम्ही त्यावर विकू शकता. पण योग्य ती खबरदारीही घेतली पाहिजे नाहीतर मोठं नुकसान होऊ शकतं. अशीच एक घटना नागपूरमध्येही घडली, जिथे ऑनलाइन माध्यमातून बाईक विकणं एका तरीणाला फारच महागात पडल. तिने OLX वर बाईक विकण्यासाठी जाहिरात तर दिली पण पहिला ग्राहक येताच तिला मोठा फटका बसला. बाईकची ट्रायल घेण्याच्या बहाण्याने तो तरूण बाईक घेऊनचा फरार झाला.

असा घातला गंडा

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत चोरीचा हा गुन्हा घडला. पारूल सोनी या तरूणीने (OLX) ‘ओएलएक्स’ या संकेतस्थळावर दुचाकी विकण्याची जाहिरात अपलोड केली होती. ती जाहिरात पाहून सचिन नावाच्या इसमाने तिला फोन केला आणि बाईक पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्याने पारुल सोनी हिला गाडी पाण्याच्या बहाण्याने केडीके कॉलेजजवळ बोलावले.

दोघेही तेथे पोहोचल्यानंतर सचिनने पारुलला बाईकची ट्रायल घेण्याबद्दल विचारले. तिने होकार दिल्यानंतर तो बाईकवर बसला आणि पुढे गेला. मात्र बराच वेळ झाला तरी तो परत आलाच नाही. अखेर तो बाईक घेऊन फरार झाल्याचे आणि आपली फसवणूक झाल्याचे पारुल हिच्या लक्षात आले. तिने तातडीने नंदनवन पोलीस ठाणे गाठून सर्व प्रकार कथन करत यासंदर्भात तक्रार नोंदवली. बाईक चोरीच्या या घटनेसंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा कसून शोध घेण्यात येत आहे. दरम्यान कोण कोणाची फसवणूक कशा प्रकारे करेल याचा काही नेम नाही त्यामुळे कुठलाही व्यवहार करताना सावध राहून करणे गरजेचं आहे , असा सल्ला देत पोलिसांनी सर्वांना सावध आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले.

Non Stop LIVE Update
आगामी निवडणुकीच्या तोंडावर आमदारांना भरमसाठ निधी, एकाला किती कोटी?
आगामी निवडणुकीच्या तोंडावर आमदारांना भरमसाठ निधी, एकाला किती कोटी?.
दिशा सालियान प्रकरण नेमकं काय? आदित्य ठाकरेंशी का लावलं जातंय कनेक्शन?
दिशा सालियान प्रकरण नेमकं काय? आदित्य ठाकरेंशी का लावलं जातंय कनेक्शन?.
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी होणार SIT चौकशी?
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी होणार SIT चौकशी?.
आव्हाडांना दणका,विधानभवन परिसरातील NCP च्या कार्यालयाची नेमप्लेट हटवली
आव्हाडांना दणका,विधानभवन परिसरातील NCP च्या कार्यालयाची नेमप्लेट हटवली.
वाढलेली ढेरी, अजितदादा आणि आव्हाड यांच्यात पोटसूड, काय केली टीका?
वाढलेली ढेरी, अजितदादा आणि आव्हाड यांच्यात पोटसूड, काय केली टीका?.
गळ्यात संत्र्यांची माळ अन निषेध; बळीराजाच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक
गळ्यात संत्र्यांची माळ अन निषेध; बळीराजाच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक.
नवाब मलिक अधिवेशनात, कोणाला पाठिंबा देणार? अजित पवार की शरद पवार?
नवाब मलिक अधिवेशनात, कोणाला पाठिंबा देणार? अजित पवार की शरद पवार?.
चार पक्ष अन् सगळे दक्ष; सातारा लोकसभा एकच लक्ष्य, कोणी सांगितला दावा?
चार पक्ष अन् सगळे दक्ष; सातारा लोकसभा एकच लक्ष्य, कोणी सांगितला दावा?.
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला.
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?.