AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आठ वर्षांच्या लिव्ह-इनचा दुर्दैवी अंत, आधी पार्टनरची हत्या, नंतर ..

नागपूरमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. ८ वर्षांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपचा दुर्दैवी अंत झाला आहे. शुल्लक कारणावरून एका इसमाने त्याच्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या केली आणि त्यानंतर स्वत:चा जीव घेण्याचाही प्रयत्न केला.

आठ वर्षांच्या लिव्ह-इनचा दुर्दैवी अंत, आधी पार्टनरची हत्या, नंतर ..
| Updated on: Feb 28, 2024 | 9:18 AM
Share

नागपूर | 28 फेब्रुवारी 2024 : राज्यात गुन्ह्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक जीव अक्षरश: मुठीत धरून जगत आहेत. आता नागपूरमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. ८ वर्षांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपचा दुर्दैवी अंत झाला आहे. शुल्लक कारणावरून एका इसमाने त्याच्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या केली आणि त्यानंतर स्वत:चा जीव घेण्याचाही प्रयत्न केला. ही घटना नागपूर जिल्ह्यातील बोरी पोलीस ठाणे अंतर्गत एमआयडीसीच्या बीड गणेशपूर येथे घडल्याचे उघडकीस आले आहे. रणजित नत्थू चौधरी असं आरोपीचं नाव असून त्याने सुनिता या महिलेची हत्या करून आत्महत्येचा प्रय्तन केला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रणजित आणि मृत महिला सुनिता हे दोघेही मूळचे मध्य प्रदेशच्या पांडुरणा येथील रहिवासी आहेत. गेल्या आठ वर्षांपासून ते दोघं लिव्ह-इनमध्ये रहात होते. त्यांच्यासोबत सुनिता हिची तीन मुलंही रहायची. सोमवारी सुनिता आणि रणजित यांच्यात कडाक्याचं भांडण झालं होतं. नंतर ते भांडण मिटलं आणि सगळं काही सुरळीत झालं. मात्र, सोमवारी झालेल्या वादाचा राग आरोपीच्या मनात होता. तोच राग मनात ठेवून त्याने संतापाच्या भरात सुनिता हिच्यावर धारदार चाकूने वार करून तिची हत्या केली . ती मृत झाल्यानंतर आरोपी रणजितने त्याच चाकूने स्वतःचा गळा चिरुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच बोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी रणजितला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

आठ वर्षांपासून होते संबंध

मिळालेल्या माहितीनुसार, रणजित व सुनिता हे आठ वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये रहायचे. पण आरोपी रणजित हा कामानिमित्त पुण्याला रहायचा. अधूनमधून तो सुनिताला भेटण्यासाठी नागपूरला यायचा. घटनेच्या आदल्या दिवशी त्या दोघांमध्ये पैशांवरून वाद झाला. मात्र थोड्या वेळाने ते भांडण मिटलं आणि सगळं सुरळीत झालं. पण आरोपीच्या मनात तो राग होताच, त्याच रागातून त्याने हे नृशंस कृत्य केलं आणि स्वत:लाही संपवण्याचा प्रयत्न केला.

Follow Us
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बडा नेता शिंदे गटात...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बड्या नेत्याचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक कलांमध्ये ट्रम्प यांना मोठा धक्का
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण...
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण समोर
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवार..
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवारांवरच केला आरोप!
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध नाही, केवळ...