घराशेजारील जमिनीचा वाद विकोपाला; सकाळी मध्यस्थी नंतर चाकूचे वार, नागपुरात थरार

ही झोपडी मला दे. तिथं मी दुकान लावणार असं आरतीचं म्हणणं होतं. तुम्ही घर बांधलं तिथं शिफ्ट व्हा. या कारणावरून त्यांचा वाद झाला. सकाळी वाद झाला होता. नंतर मध्यस्ती झाली.

घराशेजारील जमिनीचा वाद विकोपाला; सकाळी मध्यस्थी नंतर चाकूचे वार, नागपुरात थरार
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 2:39 PM

नागपूर : घराशेजारील व्यक्तीसोबत वाद असेल तर जरा सांभाळून कारण त्याचा शेवट भयानक होऊ शकतो. अशीच एक घटना नागपुरात ( Nagpur Crime) घडली. शेजारील व्यक्तीसोबत जमिनीशी संबंधित वाद होता. त्याची झोपडी तिला हवी होती. त्या जागेवर ती ताबा मिळवू इच्छित होती. पण, त्याला ते मंजूर नव्हते. शेवटी वाद झाला. या वादातून त्याने तिला संपवले. झोपडीच्या वादातून महिलेचा चाकूने भोसकत खून (Nagpur Murder) केला. ही घटना रामबाग परिसरात घडली. आरती निकोलस असं मृतक महिलेचं नाव आहे. तर बादल कुमरे असं आरोपीचे नाव आहे.यात इमामवाडा पोलिसांनी आरोपी बादलला अटक केली. अशी माहिती इमामवाडाचे पोलीस निरीक्षक राजकुमार वाघमारे यांनी दिली.

सपासप चाकूने वार

नागपूरच्या विमा वाडा पोलीस स्टेशन हळदीमध्ये झोपडीच्या वादातून महिलेची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात तणावाच वातावरण निर्माण झालं होतं. आरोपी बादलचं घराचं बांधकाम सुरू होतं. अतिक्रमण केलेल्या जागेवर झोपडी बांधली होती. याच जागेसाठी आरती आणि बादलच भांडण झालं. सकाळी झालेलं भांडण दुपारी विकोपाला गेलं. बादलनं सपासप चाकूनं वार करत आरतीला गंभीर जखमी केलं. अखेर उपचारादरम्यान संध्याकाळी आरतीचा मृत्यू झाला. या परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झालीय.

नेमकं काय घडलं?

बादलच्या घराचं बांधकाम सुरू होतं. त्यासाठी त्याने झोपडी अतिक्रमीत जागेवर बांधली होती. ही झोपडी मला दे. तिथं मी दुकान लावणार असं आरतीचं म्हणणं होतं. तुम्ही घर बांधलं तिथं शिफ्ट व्हा. या कारणावरून त्यांचा वाद झाला. सकाळी वाद झाला होता. नंतर मध्यस्ती झाली. पण, त्यानंतर तो आला त्याने चाकूने सपासप वार करून आरतीला जखमी केले. आरतीला मेडिकलमध्ये दाखल केल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. छोट्याशा वादातून आरतीचा जीव गेला. त्यामुळं  वाद घालताना विचार करणे गरजेचे आहे. नंतर पश्चातापाशिवाय काही राहत नाही.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.