नागपूर : आयुष्य कधी कसं कलाटणी येईल हे सांगता येत नाही. असाच एक चमत्कार नागपुरमध्ये घडला आहे. बिहारमधून हरवलेला (Missing) किशोरवयीन मूक बधिर मुलगा तब्बल 6 वर्षानंतर कुटुंबियांना नागपुरात सुखरूप सापडला आहे. आणि हे सगळं शक्य झालं ते केवळ एका आधार कार्डमुळे. सोचन कुमार यादव असं या मुलाचे नाव आहे. बिहारमधून नागपूरमध्ये पोहचलेल्या मुलाला चाईल्ड लाईन (Child Line)ने बालगृहात ठेवले होते. शैक्षणिक कामाकरीता त्याचे आधार कार्ड (Aadhar Card) बनवण्यासाठी गेल्यानंतर त्याची ओळख आणि पत्ता सामाजिक संस्थेला मिळाला. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधत त्यांच्याकडे त्याला सुपूर्द करण्यात आले.