नागपूरमध्ये कुंटणखाना चालविणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, दोन महिलांची सुटका

महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेणारा आरोपी आकाश शाहूला अटक करत दोन महिलांची सुटका केली. यापैकी एक 23 वर्षीय मुलगी नागपूरची असून दुसरी मुलगी कोलकात्यावरून या व्यवसायासाठी बोलविण्यात आली होती.

नागपूर : कुंटणखाना चालविणाऱ्या आरोपीला सापळा रचून पोलिसांनी अटक केली असून दोन महिलांची सुटका करण्यात आली. आकाश साहू असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. नवीन नागपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनीष नगर मधील भागात ओयोची सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये आकाश वेश्याव्यवसाय चालवत होता. गेल्या अनेक दिवसांपासून काही महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार नागपूर क्राईम ब्रांचने सापळा रचून आरोपीला अटक केली. (Accused of running a prostitution business in Nagpur was handcuffed by the police)

पोलिसांनी बनावट ग्राहक पाठविला होता. त्याच्यामार्फत मुलीचा सौदा केला. त्या भागात अशा प्रकारचा व्यवसाय होते याची खात्री पटताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी कार्यवाही केली. महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेणारा आरोपी आकाश शाहूला अटक करत दोन महिलांची सुटका केली. यापैकी एक 23 वर्षीय मुलगी नागपूरची असून दुसरी मुलगी कोलकात्यावरून या व्यवसायासाठी बोलविण्यात आली होती. आरोपी शाहू याचा गुन्हेगारी रेकॉर्ड तपासून पोलीस पुढील कार्यवाही करत आहे. नागपुरात गेल्या काही दिवसात असे गुन्हे मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत.

पुण्यात कामगार महिलेला डोंगरावर नेत तिच्यासोबत भयावह कृत्य

महिलेला काम देतो असं सांगत तिला फसणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी आरोपीच्या कर्नाटकातल्या गावात जावून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. विशेष म्हणजे पोलिसांनी फक्त सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीवरुन या गुन्ह्याचा खुलासा करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचं श्रीनिवास गणेश जाधव असं नाव आहे.

संबंधित घटना ही 1 सप्टेंबरला दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली होती. आरोपीने पीडित महिलेला गवत कापण्याचं काम देतो असं सांगत तिला कानिफनाथ डोंगर परिसरात नेलं होतं. तिथे परिसरात फारशी वर्दळ नव्हती. याच गोष्टीचा फायदा घेत आरोपीने महिलेला थेट दगडाने मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपीने महिलेला मारहाण करत तिच्या अंगावरील दागिने हिसकावले. त्यानंतर तो तिथून पळून गेला. या घटनेमुळे परिसरातील महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. (Accused of running a prostitution business in Nagpur was handcuffed by the police)

इतर बातम्या

ज्या जेलमध्ये कसाबला ठेवलं, संजय दत्त राहीला, तिथंच आता आर्यन खानची रवानगी, कशी आहे आर्थर रोड जेल?

आर्यन खान, मुक्काम-आर्थर रोड जेल, बराक क्रमांक 1, दिनचर्या कशी असणार? वाचा सविस्तर

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI