खतरनाक… पती मोबाईल देत नाही, पत्नीने विळ्याने पतीचे ओठ कापले

मोबाईलच्या नादात कोण करेल याचा काहीही नेम नाही. अशीच एक धक्कादायक घटना भंडाऱ्यातील मासळ येथे घडली आहे. येथे एका पत्नीने मोबाईलसाठी आपल्या पतीचे विळ्याने ओठ कापले आहेत. याप्रकरणी पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खतरनाक... पती मोबाईल देत नाही, पत्नीने विळ्याने पतीचे ओठ कापले
प्रातिनिधिक फोटो

भंडारा : मोबाईलच्या नादात कोण करेल याचा काहीही नेम नाही. अशीच एक धक्कादायक घटना भंडाऱ्यातील मासळ येथे घडली आहे. येथे एका पत्नीने मोबाईलसाठी आपल्या पतीचे विळ्याने ओठ कापले आहेत. याप्रकरणी पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

भंडाऱ्यातील मासळ येथे खेमराज बाबुराव मुल (वय – 40) हे राहातात. त्यांचा मोबाईल बिघडला असल्याने त्यांनी त्यांच्या पत्नीचा मोबाईल घेतला. मात्र, दोन दिवस उलटूनही त्यांनी पत्नीला तिचा मोबाईल परत केला नाही . त्यामुळे गुरुवारी (14 ऑक्टोबर) त्यांच्यात मोबाईलसाठी खूप भांडण झालं. हे भांडण इतक्या टोकाला गेलं की पत्नीने रागाच्या भरात येऊन घरातील विळा खेमराज यांना फेकून मारला. हा विळा खेमराज यांच्या तोंडावर बसला आणि त्यात त्यांचे ओठ कापले गेले.

यानंतर तशाच जखमी अवस्थेत खेमराज हे लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर खेमराज यांच्या जबाबावरुन आणि वैद्यकीय तपासणीनंतर त्यांच्या पत्नीविरोधात लाखांदूर पोलीस ठाण्यात कलम 324 आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पतीचे दुसर्‍या महिलेशी प्रेमसंबंध, पत्नीकडून पतीची गोळी झाडून हत्या, मग शरीराचे तुकडे

पतीचे दुसऱ्या महिलेशी असलेले प्रेमसंबंध कळल्यावर एका महिलेला तिचा संताप इतका अनावर झाला की तिने तिच्या पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना ब्राझिल येथे घडली आहे. महिलेने प्रथम आपल्या पतीला ठार मारले, नंतर त्याच्या शरीराचे लहान लहान तुकडे करुन सुटकेसमध्ये भरले. सुटकेसमध्ये मृतदेहाचे तुकडे घेऊन जाणारी महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली, ज्याच्या आधारे पोलिसांनी तिला अटक केली.

सूडाच्या भावनेने बनली खूनी

‘डेली स्टार’च्या बातमीनुसार, ब्राझीलमध्ये राहणाऱ्या एलीझ मात्सुनागाला तिचा पती मार्कोस मात्सुनागाचे दुसऱ्या महिलेशी असलेल्या संबंधांबद्दल माहिती मिळाली. तिच्या पतीच्या फसवणुकीमुळे, एलिसाचा संताप अनावर झाला. तिला कोणत्याही परिस्थितीत तिच्या पतीचा बदला घ्यायचा होता आणि या इच्छेत ती खुनी बनली. तिने घरीच ही हत्या केली.

संबंधित बातम्या :

पतीचे दुसर्‍या महिलेशी प्रेमसंबंध, पत्नीला राग अनावर; आधी गोळी मारली मग शरीराचे केले तुकडे

खोलीत कोब्रा सोडून 25 वर्षीय पत्नीची हत्या, पती दोषी सिद्ध, शिक्षेकडे लक्ष

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI