चंद्रपुरात ‘मुळशी पॅटर्न’, कुख्यात गुंडाची भर दिवसा हॉटेलमध्ये निर्घृण हत्या, टोळी युद्धाचा धोका वाढला

चंद्रपुरात महिन्याभरात हत्येची चौथी घटना आज घडली आहे. विशेष म्हणजे भर दिवसा एका हॉटेलमध्ये पाच जणांनी मिळून एका कुख्यात गुंडाची हत्या केली आहे. या हत्येमुळे चंद्रपुरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या घटनेमुळे पुन्हा शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. आरोपींना पोलिसांचं भय राहिलेले नाही, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होत आहे. याशिवाय या हल्ल्यानंतर आता चंद्रपुरात टोळीयुद्धाचा धोका वाढला आहे.

चंद्रपुरात 'मुळशी पॅटर्न', कुख्यात गुंडाची भर दिवसा हॉटेलमध्ये निर्घृण हत्या, टोळी युद्धाचा धोका वाढला
कुख्यात गुंडाची भर दिवसा हॉटेलमध्ये निर्घृण हत्या, चंद्रपुरात टोळी युद्धाचा धोका वाढला
Follow us
| Updated on: Aug 12, 2024 | 11:21 PM

चंद्रपूर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. कारण चंद्रपूर शहरात सातत्याने हत्याच्या घटना समोर येत आहेत. विशेष म्हणजे या हत्येच्या घटनांनी आता तर थेट टोक गाठलं आहे. कारण चंद्रपुरात आज भर दिवसा एका कुख्यात गुंडाची एका हॉटेलमध्ये चार जणांनी मिळून हत्या केली आहे. हाजी सरवर असं मृतक गुंडाच नाव आहे. हाजी सरवर हा कुख्यात गुंड होता. तो विदर्भात कोळसा माफिया म्हणूनही कुप्रसिद्ध होता. तसेच त्याच्यावर खंडणी वसुली, हत्या, सुपारी घेऊन मारपीट करणे, आरोपींना शरण देणे असे अनेक गुन्हे दाखल होते. त्याच्यावर तडीपार आणि मोक्काचीदेखील कारवाई झाली होती. गेल्या काही दिवसांपासून तो जेलमधून बाहेर होता. या दरम्यान त्याची आज भर दिवसा चंद्रपुरातील एका हॉटेलमध्ये हत्या झाली आहे.

चंद्रपूर शहरातील बिनबा गेट भागात असलेल्या हॉटेल शाही दरबारमध्ये ही हत्येची घटना घडली. आपल्या साथीदारांसह जेवणासाठी पोहोचलेल्या कुख्यात गुंड हाजी सरवर याची आज संध्याकाळी 4 वाजता हत्या करण्यात आली. पाच जणांच्या टोळक्याने अचानक हॉटेलमध्ये येत गोळीबार केला. या गोळीबारात हाजी सरवरला दोन गोळ्या लागल्या तर त्याच्या एका साथीदाराला एक गोळी लागली. शिवा असं सरवरच्या जखमी झालेल्या साथीदाराचं नाव आहे. दोन गोळ्या लागल्यानंतर हाजी सरवर हा जीव वाचवण्यासाठी हॉटेलच्या किचनमध्ये पळाला. पण आरोपींनी त्याच्या जवळ जात त्याच्यावर चाकूने हल्ला केला. आरोपींनी हाजी सरवरचा गळा चिरला. यानंतर आरोपी तिथून पळून गेले.

आरोपींचं आत्मसमर्पण

या थरारक घटनेनंतर हॉटेल मालकाने पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत गंभीर जखमी झालेला हाजी सरवर याचे रुग्णालयात नेताना निधन झाले. तर घटनेत शिवा नामक हाजीचा सहकारी जखमी झालाय. दुसरीकडे घटनेनंतर अवघ्या अर्ध्या तासातच या घटनेतील पाचही आरोपींनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. हाजी सरवर याचे शव जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचताच तिथे त्याच्या समर्थक आणि नातेवाईकांनी एकच गर्दी केली. जिल्हा सामान्य रुग्णालयात तणावाची स्थिती निर्माण झाल्यानंतर परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले. पाचही आरोपींकडून देशी बनावटीची एकूण 4 शस्त्रे ताब्यात घेण्यात आली आहेत.

यातील प्रमुख आरोपी असलेला समीर शेख हा 2009 ते 2016 या काळात गुंड हाजी याचा प्रमुख साथीदार होता. मात्र नंतर दोघांची मोक्का अंतर्गत कारागृहात रवानगी झाली. त्यांच्यात पैशावरून आणि अन्य काही कौटुंबिक मुद्द्यांवरुन संघर्ष झाला होता. नुकतंच नागपुरात या दोघांमध्ये समेट घडवण्यासाठी एक बैठक झाल्याची देखील माहिती पुढे आली होती. दरम्यान अनेक व्यवहारात आपण आर्थिकदृष्ट्या फसलो, अशी भावना आरोपी समीर शेख याची झाली होती. त्यामुळे त्याने वेळ मिळताच आपल्या दिग्रसच्या तीन, नागपुरातील एक तर घुगुस परिसरातील नकोडा गावातील एका साथीदारासह हाजीला संपविले. या कटात आणखी किती लोक सहभागी आहेत याचा तपास पोलीस करत आहेत.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.