AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Crime : स्वस्तात दुचाकी देण्याचं आमिष दाखवत ग्राहकांची फसवणूक, दोन आरोपी अटक

मनी प्लांट नावाने एक मार्केटिंग कंपनी स्थापन करत ज्युपिटर मोपेड गाडी 30 हजार रुपयात मिळवून देण्याचे आमिष ग्राहकांना दाखविण्यात आलं. मात्र 30 हजारात गाडी मिळविण्यासाठी चार ग्राहक शोधावे लागणार मग ती गाडी मिळेल, अशा प्रकारची योजना होती.

Nagpur Crime : स्वस्तात दुचाकी देण्याचं आमिष दाखवत ग्राहकांची फसवणूक, दोन आरोपी अटक
स्वस्तात दुचाकी देण्याचं आमिष दाखवत ग्राहकांची फसवणूकImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 27, 2022 | 6:05 PM
Share

नागपूर : स्वस्तात दुचाकी देण्याचं आमिष दाखवत चैन मार्केटिंगच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक (Cheating) करणाऱ्या दोन आरोपींना नंदनवन पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. आरोपींनी आतापर्यंत 10 ते 12 ग्राहकांना फसविल्याचं तपासात निष्पन्न झाले आहे. गजानन बोरीकर आणि अजय हिंगे अशी अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. आरोपींनी 30 हजारात ज्युपिटर मोपेड (Jupiter Moped) गाडी देण्याचे आमिष दाखवले होते. आरोपींची नंदनवन पोलीस कसून चौकशी करत आहेत. फायनान्स कंपनीच्या नोटीशीनंतर सर्व प्रकार उघडकीस आला. चैन मार्केटिंगच्या नावावर अनेकांची फसवणूक झाल्याचं नेहमी पुढं येत असतं. मात्र तरीही नागरिक अशा आमिषांना बळी पडतात आणि फसतात.

30 हजार रुपयात ज्युपिटर मोपेड गाडी देण्याचे आमिष

मनी प्लांट नावाने एक मार्केटिंग कंपनी स्थापन करत ज्युपिटर मोपेड गाडी 30 हजार रुपयात मिळवून देण्याचे आमिष ग्राहकांना दाखविण्यात आलं. मात्र 30 हजारात गाडी मिळविण्यासाठी चार ग्राहक शोधावे लागणार मग ती गाडी मिळेल, अशा प्रकारची योजना होती. त्याचा लाभ घेण्यासाठी अनेकांनी त्यात पैसे गुंतवले आणि ग्राहक शोधले. त्यानंतर ज्या ग्राहकाने अटी पूर्ण केल्या त्यांना शो रूममध्ये नेऊन गाडी दिली जायची. मात्र त्यासाठी काही पेपर साइन करुन घेतले जायचे. ते पेपर फायनान्स कंपनीचे असायचे. म्हणजे गाडी पूर्ण फायनान्सवर उचलायची आणि आपल्या ग्राहकाला 30 हजारात गाडी मिळवून दिली असं संगायचं.

फायनान्स कंपनीने हफ्त्यासाठी ग्राहकाला फोन केल्यानंतर भांडाफोड

मात्र इकडे फायनस कंपनीने आपला महिना भरताच ग्राहकांना इन्स्टॉलमेंटसाठी नोटीस दिली. त्यावरून या कंपनीची भांडाफोड झाली. हा सगळा प्रकार 2019 पासून सुरू होता. याप्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा करत पोलिसांनी गजानन बोरीकर आणि अजय हिंगे या एजंटला अटक केली. मात्र कंपनीचा व्हाईट कॉलर मुखिया अजून पोलिसांच्या हाती लागला नसून पोलीस त्याचा शोध पोलीस घेत आहेत. (Cheating customers by offering cheap bikes in Nagpur)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.