पोलीस आणि एफडीएची मोठी कारवाई, ‘या’ कंपनीवर धाड टाकत लाखोंचा माल केला हस्तगत

पोलीस आणि अन्न प्रशासन विभागाने केलेल्या या कारवाईमध्ये जवळपास 12 लाख रुपये किमतीचा पिस्ता आणि ते बनविण्यासाठी लागणाऱ्या मशीन जप्त करण्यात आल्या.

पोलीस आणि एफडीएची मोठी कारवाई, 'या' कंपनीवर धाड टाकत लाखोंचा माल केला हस्तगत
बनावट पिस्ता बनविणाऱ्या कंपनीवर धाडImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Nov 15, 2022 | 4:20 PM

नागपूर : नागपूर पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई केली आहे. बनावट पिस्ता बनविणाऱ्या कंपनीवर धाड टाकत 12 लाख रुपये किमतीचा बनावट पिस्ता आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

अशी उघडकीस आली घटना

नागपूर पोलिसांनी एका व्यक्तीला दुचाकी वाहनावर संशयितरित्या सामान घेऊन जाताना बघितलं. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, त्याच्याजवळ काही बॅगमध्ये शेंगदाण्याप्रमाणे दिसणारा पिस्ता आढळून आला. मात्र तो पिस्ता रंग लावलेला आणि कटिंग करून बनविला होता.

पोलिसांनी त्याला कुठून आणल्याचा विचारलं तेव्हा त्याने गोळीबार चौकातील एका कंपनीतून हा आणला असून, याची मोठ्या प्रमाणात विक्री मिठाई बनवणाऱ्या कंपन्यांसाठी होते असल्याचं सांगितलं.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी सापळा रचत धाड टाकली

पोलिसांनी सापळा रचत बनावट पिस्ता बनवणाऱ्या कंपनीवर धाड टाकली. त्या ठिकाणी पाहिलं तर शेंगदाणे भिजवून त्याला वाळवले जात होते. वाळलेल्या शेंगदाण्यांना घातक रंग लावून मग मशीनच्या साह्याने पिस्ताप्रमाणे त्याची कटिंग केली जायची.

70 रुपये किलोच्या भावाने मिळणाऱ्या शेंगदाण्याला हे लोक त्याला पिस्ता बनवून 1100 रुपये किलोच्या भावाने विकायचे. पोलिसांनी यावेळी सगळा माल जप्त केला.

पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला याची माहिती दिली. ते अधिकारीही त्या ठिकाणी दाखल झाले आणि हा संपूर्ण पिस्ता बघितल्यानंतर त्यांनीही आश्चर्य व्यक्त केले.

12 लाखाच्या बनावच पिस्तासह मशिन जप्त

पोलीस आणि अन्न प्रशासन विभागाने केलेल्या या कारवाईमध्ये जवळपास 12 लाख रुपये किमतीचा पिस्ता आणि ते बनविण्यासाठी लागणाऱ्या मशीन जप्त करण्यात आल्या. सोबतच दोन आरोपींना सुद्धा पोलिसांनी अटक केली.

पैसे कमवण्यासाठी नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न या लोकांनी केला आहे. बोगस पिस्ता बनवून तो मार्केटमध्ये विकण्याचा गोरखधंदा गेल्या अनेक वर्षापासून सुरू असल्याचे समोर आले आहे. मात्र आता पोलिसांनी यांना बेड्या ठोकल्या आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.